Dhangar community Saam tv
महाराष्ट्र

Dhangar community : धनगर समाज आरक्षणासाठी आक्रमक; देवेंद्र फडणवीसांच्या ताफ्यावर भंडारा उधळण्याचा प्रयत्न, VIDEO

Vishal Gangurde

रणजीत माजगावकर, साम टीव्ही प्रतिनिधी

सोलापूर : धनगर समाज एसटी कोट्यातून आरक्षण मिळावं, या मागणीसाठी आक्रमक झाला आहे. सोलापुरात धनगर समाजातील कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या ताफा अडवत प्रयत्न केला आहे. देवेंद्र फडणवीस हे सोलापूर विमानतळाहून मंगळवेढाकडे निघाले असताना धनगर समाजातील आंदोलकांनी ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर परिसरात काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

धनगर समाजाला एसटीमधून आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी, या मागणीसाठी धनगर समाजातील आंदोलकांनी ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. सोलापुरात धनगर समाजाचे कार्यकर्ते शेखर बंगाळे यांनी मजरेवाडी चौकात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. शेखर बांगळे यांनी या आधी तत्कालीन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर भंडारा उधळला होता.

राज्य सरकारकडून धनगड जातीचे प्रमाणपत्र रद्द

राज्यातील धनगड हे जातीचे प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेण्यात आला आहे. राज्यात धनगर आणि धनगड असा वाद होता. राज्यात धनगड हा समाज नाही. मात्र तरी देखील ७ जातीचे दाखले धनगड या नावाने देण्यात आली होती. हे दाखले बोगस आहेत. त्यामुळे हे रद्द करण्यात यावे, अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली होती. त्यानंतर राज्य सरकारने ७ धनगड जातीचे प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहेत.

1. भाऊसाहेब नामदेव खिल्लारे

2. रमेश नामदेव खिल्लारे

3. कैलास नामदेव खिल्लारे

4. मंगल नामदेव खिल्लारे

5. सुभाष नामदेव खिल्लारे

6. सुशिल भाऊसाहेब खिल्लारे

7. सागर कैलास खिल्लारे

दरम्यान, धनगड जातीचे प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्यानंतर आमदार गोपीचंद पडळकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 'जात पडताळणी समितीने एकदा दिलेला दाखला रद्द करण्याचा अधिकार जात पडताळणी समितीला नव्हता, तो अधिकार जात पडताळणी समितीला देऊन जे बोगस धनगडांचे दाखले काढले होते. ते ६ दाखले रद्द केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे मनःपूर्वक आभार. यामुळे धनगर एसटी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे, असे पडळकर म्हणाले.

सुप्रिया सुळेंची टीका

राज्य सरकारच्या निर्णयावर सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं आहे. 'दाखले रद्द करून प्रश्न सुटतोय का? धनगड आणि धनगर यामध्ये नेमका काय प्रश्न आहे, हे सरकारने आम्हाला सांगितलं पाहिजे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabetes risk : समोसा,भजी, वेफर्स खाताय? सावधान; संशोधनातून धक्कादायक माहिती समोर

Black Rose: काळा गुलाब कोणत्या देशात आढळतो?

Marathi News Live Updates : मनसेचं उद्यापासून मिशन वरळी, राज ठाकरेंच्या हस्ते शाखा उद्घाटन

VIDEO : रत्नागिरीत मंत्री उदय सामंतांना दाखवले काळे झेंडे; पाहा काय आहे प्रकरण

National Animal: भारताचा वाघ, तर पाकिस्तानचा राष्ट्रीय प्राणी कोणता? पाहून हसायलाच येईल

SCROLL FOR NEXT