परळी नगरपालिका निवडणुकीत वाल्मिक कराड पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय आणि त्याला कारण ठरलं... धनंजय मुंडेंनी भरसभेत वाल्मिक कराडची काढलेली आठवण.... मुंडेंचं हे विधान ऐका....मुंडेंच्या भरसभेतील याचं कराडप्रेमामुळे आता त्याच्या अडचणीत चांगलीच वाढ झालीय... वाल्मिक कराडची आठवण काढणाऱ्याला पक्षातून काढून टाकलं पाहिजे अशी मागणी विरोधकांनी केलीय. .तर काहींनी मुंडेंना कराडसोबत तुरुंगात जाण्याचा खोचक सल्ला दिलाय...
कराड हा धनंजय मुंडेंचा जवळचा सहकारी समजला जातो...कराड जगमित्र या मुंडेंच्या कार्यालयाचा कारभार पाहायचा... परळी नगरपरिषद निवडणुकीत कराड महत्त्वाची भूमिका निभावायचा..त्यामुळे परळी शहरातील कराड समर्थकांना भावनिक साद घालण्यासाठी मुंडेंनी कराडची आठवण काढल्याचीही चर्चा आहे..
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात तुरुंगात असणाऱ्या वाल्मिक कराडचे अनेक कारनामे गेल्या वर्षभरापासून चर्चेत आहेत... कराडमुळे धनंजय मुंडे अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकलेत... तरीही प्रचार सभेत वाल्मिक कराडची उणीव भासत असल्याचं मुंडेंचं विधान आता त्यांच्या अडचणीत आणखी भर घालणार हे निश्चित... मात्र भरसभेत एका आरोपीची आठवण काढून मतदारांना साद घालणं कितपत योग्य.. याचा विचार परळीतल्या जनेतेनं करायला हवा...अन्यथा बीड जिल्ह्याला लागलेली गुंडगिरीची कीड राज्यभर पसरायला वेळ लागणार नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.