hananjay Munde Speech  saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: राज्यातील राजकीय उलथापालथ परळीला विचारल्याशिवाय होणार नाही, हे सिद्ध करुन दाखवलं - धनंजय मुंडे

Dhananjay Munde Speech Today: कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर धनंजय मुंडे यांचे बीड जिल्ह्यात अभूतपूर्व स्वागत करण्यात आले.

Chandrakant Jagtap

>> विनोद जिरे, साम टीव्ही

Dhananjay Munde Latest Speech: राज्यातील राजकीय उलथापालती परळीला विचारल्याशिवाय होणार नाही, हे सिद्ध करुन दाखवलं असे म्हणत मंत्री धनंजय मुंडे यांनी परळीतील जनतेचे आभार मानले आहेत. धनंजय मुंडे यांचं आज परळीत जंगी स्वागत करण्यात आलं.

यावेळी बोलताना ते म्हणाले, काही महिन्यापूर्वी याच मातीत मी म्हटलं होतं 'जरा सा वक्तने साथ क्या ना दिया, लोग मेरी काबिलियत पे शक करणे लगे'. आज आपण काबिल आहोत, हे मी देशाला दाखवून दिलं आहे. याच जागेवर अख्ख मंत्रिमंडळ तुमच्या भेटीसाठी आणतो असं अश्वासन देखील धनंजय मुंडे यांनी यावेळी परळीतील जनतेला दिलं.

कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर धनंजय मुंडे यांचे बीड जिल्ह्यात अभूतपूर्व स्वागत करण्यात आले. या स्वागतानंतर बोलताना धनंजय मुंडे भावूक झाले. जो विश्वास आणि जे प्रेम या जनतेनं माझ्यावर केलं आहे, त्याची परतफेड मी असंख्य जन्मातही करू शकणार नाही, असे म्हणत मंत्री धनंजय मुंडे परळीच्या जनतेसमोर नतमस्तक झाले. यावेळी परळी मतदारसंघासह जिल्ह्यातील मोठ्या संख्यने कार्यकर्ते उपस्थित होते.

मंत्रिपदाची शपथ घेतल्यानतंर पहिल्यांदाच बीड जिल्ह्यात आलेल्या धनंजय मुंडे यांचा परळीत भव्य नागरी सत्कार करण्यात आला. हजारोंच्या जनसमुदायाच्या उपस्थितीत धनंजय मुंडेंनी आपल्या भावनांना व्यक्त केल्या. ते म्हणाले, मी परळीकरांना शब्द दिला होता की राजकीय पटलावर ज्यावेळी काही उलथापालथी घडतील त्यावेळी परळीच्या वैद्यनाथाला विचारल्याशिवाय काही होणार नाही, आज ते सिद्ध झाले आहे.

काही महिन्यापूर्वी याच मातीत मी म्हटलं होतं 'जरा सा वक्तने साथ क्या ना दिया, लोग मेरी काबिलियत पे शक करणे लगे' आज आपण काबिल आहोत हे मी देशाला दाखवून दिलं आहे, असेही ते म्हणाले.

धनंजय मुंडे म्हणाले, सत्ता येते, जाते पण वाईट काळात ज्यांनी मदत केली त्यांचे उपकार विसरायचे नसतात. 2010 ला विधान सभेला मी लायक असतांनाही मला विधान परिषद लढवावी लागली. सभागृहात जायला दोन मतं कमी होती, त्या परिस्थितीत अजित दादांनी मला विधान परिषदेवर संधी दिली. (Tajya Marathi Batmya)

पुढे बोलताना ते म्हणाले की, आता मी मंत्री झालोय, लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत, कार्यकर्त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणं अवघड नसतं. पण वेळ लागेल. नाराज होवू नका, विधानसभेच्या प्रचाराच्या वेळी जी जी वचनं दिली होती ती वचनं मी वर्षभरात पुर्ण करील. आज खुप काही बोलायचं होतं पण वेळ नाहीये, त्यामुळं जास्त बोलता येणार नाही. मात्र याच जागेवर राज्याच्या अख्ख्या मंत्रीमंडळाला तुमच्या समोर आणेल. (Latest Political News)

यावेळी बोलनाता धनंजय म्हणाले, आपल्याला दादांचं, एकनाथ शिंदेचं आणि फडणवीसांचं ऋण व्यक्त करायचं आहे. शेवटी इतकच सांगतो, विश्वास ठेवा असं काम करेल की जिथं जाल तिथं मान उंच करून सांगाल, तुम्ही परळीच्या भुमीतले आहात आणि तुमचा लोकप्रतिनिधी धनंजय मुंडे आहे. हे बोलताना धनंजय मुंडे भावुक झाले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

today horoscope: आज तुम्हाला अचानक… राशीत काय? चांगलं की वाईट?

Raj Thackeray: मतभेदांपेक्षा महाराष्ट्र महत्वाचा; भर सभेत राज ठाकरे यांची भावनिक साद

kiwi Benefits: किवी फळाचे असंख्य फायदे!

VIDEO : पावसात सभा झाल्यावर निवडून येतात; भाषणावेळी पाऊस आला, फडणवीसांचा शरद पवारांना टोला

Champions Trophy: टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात जाण्यास नकार का दिलाय? समोर आलं खरं कारण

SCROLL FOR NEXT