Dhananjay Munde Saam Tv
महाराष्ट्र

Dhananjay Munde : अजित पवारांनी राष्ट्रवादीसाठी काय केलं? आव्हाड आणि जयंत पाटलांच्या प्रश्नावर धनंजय मुंडेंचं ठणठणीत उत्तर

Dhananjay Munde: सांगलीत राहून आर. आर. आबांना कुणी त्रास दिला हे सर्वांनाच माहिती आहे असं म्हणत अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी जयंत पाटलांवर निशाणा साधला. कर्जत येथील कार्यक्रमात बोलताना धनंजय मुंडे यांनी अजित पवार हे शब्द पाळणारे नेते असल्याचे म्हणालेत.

Bharat Jadhav

Dhananjay Munde On Jitendra Awhad :

अजित पवार शब्दाला जागणारा आणि तो शब्द पाळणार नेता आहे. २०१४ ला निवडणूक हरल्यानंतर माझी लायकी न बघता विधान परिषदेची संधी दिली. पण ज्यांच्यामुळे अर्धा पक्ष फुटला ते आता विचारतात की अजित पवार यांनी राष्ट्रवादीसाठी काय केलं? असं म्हणत धनंजय मुंडे यांनी शरद पवार गटाच्या जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाणा साधला. त्याचबरोबर सांगलीत राहून आरआर आबांना कुणी कसा त्रास दिला हे सर्वांनाच माहिती असल्याचं म्हणत जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला. ते कर्जत येथील कार्यक्रमात बोलत होते. (Latest News)

सभेत बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, "शब्दाला जागणारा आणि तो शब्द पाळण्यासाठी जगणारा नेता एकच आहे आणि तो म्हणजे अजित पवार. काही जणांना वाटतं अजित पवार लगेच मागणी पूर्ण करावी, परंतु ते शक्य नाही. जर शब्द दिला तर तो पाळल्याशिवाय राहत नाहीत. अजित पवार यांनी जे काम केलं ते कधी सांगत नाही.

अजित पवारांनी अनेकांना अनेक जबाबदाऱ्या दिल्या, २०१४ ला निवडणूक हरल्यानंतर माझी लायकी न बघता विधानपरिषदेची संधी दिली. अजित पवार यांनी मला पक्षत घेतलं नसतं तर परळी मतदारसंघ जिंकला असता का असा सवालही त्यांनी यावेळी केला.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आव्हाड आणि पाटलांवर निशाणा

निरंजन डावखरे, गणेश नाईक यांना कुणाला कंटाळून पक्ष सोडावं लागला याच उत्तर द्या, असं म्हणत धनंजय मुंडे यांनी शरद पवार गटाच्या जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाणा साधला. अजित पवार यांनी जे काम केलं ते कधी सांगत नाही. ज्यांच्यामुळे अर्धा पक्ष फुटून गेला ते विचारतात अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्षासाठी काय केलं?

स्वर्गीय आबा जिवंत असते तर त्यांनी सांगितलं असतं की, सांगलीत राहून सांगलीतच कुणी कसा त्रास दिला असं म्हणत धनंजय मुंडेंनी जयंत पाटील यांना टोला लगावला. सुनिल शेळके यांना पक्षात घेण्यापूर्वी तिकीट जाहीर झालं, ते कुणी केलं? असाही त्यांनी प्रश्न विचारला. त्यावेळी सामाजिक न्यायाची जबाबदारी मला कुणी दिली माहिती नाही, पण मला वाटतं त्यावेळी अजित पवार यांच्या हातात तो निर्णय नसावा असं मुंडे म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Actress: फोटोतील या चिमुकलीला ओळखलंत का? आहे मराठी मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री

Shadashtak Yog 2024: शुक्र-मंगळाच्या युतीने बनला षडाष्टक राजयोग; 'या' राशी होणार श्रीमंत, करियरमध्येही होणार प्रगती

Success Story: परदेशात शिक्षण,Microsoft ची लाखोंच्या पगाराची नोकरी सोडली, ४० व्या वर्षी उभारली १२००० कोटींची कंपनी

Central Railway: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! मतदारांसाठी विशेष लोकल धावणार, वेळ काय? जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Election : महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर? भाजप उमदेवाराच्या प्रचाराला शिंदेसेनेचा नकार, गोरेगावमध्ये नेमकं काय सुरु?

SCROLL FOR NEXT