Dhananjay Munde Saam Tv
महाराष्ट्र

Beed News: कुठेही बी-बियाणे व खतांची टंचाई भासणार नाही, असे नियोजन करा; धनंजय मुंडेंचे अधिकाऱ्यांना निर्देश

Dhananjay Munde News: पालकमंत्री धनंजय मुंडेंनी बीड जिल्ह्यातील पाणी टंचाई, खरीप हंगाम, बी-बियाण्यांची उपलब्धता यांसह विविध बाबींचा समग्र आढावा घेतलाय.

विनोद जिरे

पालकमंत्री धनंजय मुंडेंनी बीड जिल्ह्यातील पाणी टंचाई, खरीप हंगाम, बी-बियाण्यांची उपलब्धता यांसह विविध बाबींचा समग्र आढावा घेतलाय. जिल्ह्यात गेल्या दोन-चार दिवसात पावसाला सुरुवात झाली असून यावर्षी खरीप हंगामात 100 टक्के पेक्षा अधिक पाऊस होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

त्या दृष्टीने शेतकरी वर्ग कामाला लागला असून पहिल्या पेरणीसाठी कापूस, सोयाबीन सह खरीप हंगामातील विविध पिकांचे बी-बियाणे व आवश्यक खते जिल्हा कृषी विभागाच्या मार्फत बाजारात उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तसेच वाढलेले खरीपाचे क्षेत्र लक्षात घेता बीड जिल्ह्यात कुठेही बी-बियाणांची किंवा खतांची कमतरता भासणार नाही, अशा दृष्टीने नियोजन करण्यात यावे, असे निर्देश राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आज पार पडलेल्या बैठकीत बीड जिल्हा प्रशासनास दिले आहे.

जनावरांच्या चाऱ्याच्या उपलब्धी संदर्भात जरी मुबलक चारा सध्या उपलब्ध असला तरी छुप्या पद्धतीने जिल्ह्यातील चाऱ्याची बाहेर जिल्ह्यात विक्री केल्याच्या तक्रारी येत आहेत. यावर अंकुश लावावा तसेच बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये तात्काळ चारा डेपो कार्यान्वित करावेत, असे निर्देश देखील धनंजय मुंडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

त्याचबरोबर काही कृषी निविष्ठा विक्रेते बी-बियाण्यांची चढ्या भावाने विक्री करत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्या प्रत्येक तक्रारीची दखल घेऊन त्याची शहानिशा करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, तसेच अशा पद्धतीची कारवाई न केल्यास राज्य शासन म्हणून संबंधित अधिकाऱ्यांवर आम्ही कारवाई करू, असा कडक इशारा यावेळी धनंजय मुंडे यांनी बैठकीत दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Electricity Prices: देशभरात वीज होणार स्वस्त; पावर ट्रेडिंग शुल्काबाबत केंद्रीय विद्युत नियामक आयोगाचा मोठा निर्णय

Maharashtra Live News Update: जळगावमध्ये महायुतीबाबत अद्यापही अनिश्चितता

Onion Rings Recipe: 31thसाठी बनवा कोल्ड ड्रिंकसोबत खायचे टेस्टी आणि क्रिस्पी ऑनियन रिंग्स, वाचा सोपी रेसिपी

Kalyan - Dombivli : कल्याण डोंबिवलीत जागा वाटपावरून भाजपमध्ये नाराजी; कोणाच्या वाटेला किती जागा? वाचा

Maharashtra Politics : खासदार असदुद्दीन ओवैसी यांना मोठा धक्का; प्रदेश कार्याध्यक्षांनी दिला पदाचा राजीनामा

SCROLL FOR NEXT