Dhananjay Munde Saam Tv News
महाराष्ट्र

...म्हणून पेट्रोल-डिझेलचे दर कमी केले, धनंजय मुंडेंकडून निर्णयाचे स्वागत

विनोद जिरे

बीड: केंद्र सरकारने अगोदर महागाई टोकावर नेली, त्यानंतर काही केल्या महागाई कमी होत नसल्याने, शेवटी दर कमी केले असं म्हणत केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलच्या दर कमतीच्या निर्णयाचं स्वागत करत, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी केंद्र सरकारला टोला लगावला आहे. ते बीडच्या परळी शहरात "राष्ट्रवादी आपल्या दारी" हे अभियान राबवत असतांना मीडियाशी बोलत होते.

बीडच्या परळी शहरात सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हे आज सकाळी 9 वाजल्यापासून, "राष्ट्रवादी आपल्या दारी अभियान" राबवत आहेत. शहरातील मिलिंद नगर भागातून या अभियानाला सुरुवात झाली असून यावेळी प्रत्येक घरी जात राष्ट्रवादी सदस्य नोंदणी करत आहेत. यावेळी सर्वसामान्य नागरिकांना घड्याळाचा वाटप करत हे अभियान पार पाडलं

यावेळी ते पुढे बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, की इतके दिवस पेट्रोल-डिझेल कुठल्या टोकाला गेलं होतं, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. ज्या वेळेस सर्व प्रयत्न करुनही महागाई थांबत नाही, हे लक्षात आल्यानंतर त्यांनी शेवटच्या क्षणी, पेट्रोल डिझेलचे दर कमी केले, आम्ही त्याचे स्वागत करू. असं म्हणत मुंडे यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलं.

तर यामध्ये त्यांनी दर कमी केले म्हणून, महाराष्ट्राने करायचे, याचा जो काही निर्णय आहे, तो राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री हे राज्याच्या मंत्रिमंडळात चर्चा करून ठरवतील. असं म्हणत मंत्री धनंजय मुंडे यांनी पेट्रोल डिझेल दरकपातीच्या निर्णयावर आपली प्रतिक्रिया दिली.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashmika Mandanna: श्रीवल्लीचा स्टनिंग लूक; ब्लॅक आऊटफिटमध्ये केला कहर

5 Laws for Woman : प्रत्येक महिलेला 'हे' ५ कायदे माहीत असलेच पाहिजेत

Maharashtra News Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर विमानतळवर दाखल

Maharashtra Politics : काँग्रेसचा १२५ जागांवर दावा, कुठे किती जागा मागितल्या?

IND vs BAN: पहिल्याच डावात केलेल्या या 3 चुका टीम इंडियाला महागात पडू शकतात

SCROLL FOR NEXT