Dhananjay Munde Saam tv
महाराष्ट्र

...तर शिंदे-फडणवीस सरकारविरोधात रस्त्यावर उतरून संघर्ष करू, धनंजय मुंडेंचा सणसणीत इशारा

परळी तालुक्यासह बीड जिल्ह्यातील शेतीचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे.

साम टिव्ही ब्युरो

रश्मी पुराणीक

परळी : मागील काही दिवसांपासून परतीच्या पावसाने थैमान घातल्यानं परळी तालुक्यासह बीड जिल्ह्यातील शेतीचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. राज्य सरकारला (Maharashtra Government) शेतकऱ्यांची ही परिस्थिती पाहिल्यानंतर तरी पाझर फुटेल का,सरकारने अतिवृष्टीने ग्रासलेल्या या शेतकऱ्यांना तत्काळ मदत जाहीर न केल्यास रस्त्यावर उतरून संघर्ष करू,असा इशारा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी केला आहे. (Dhananjay munde gives warning to Maharashtra government)

पावसाने केलेल्या नुकसानीला शासकीय यंत्रणा कोणत्या निकषात पाहतात माहीत नाही,मात्र या पावसाने झालेले नुकसान अतिवृष्टीच्या निकषांपेक्षा अनेक पटींनी जास्त आहे.मागील 15दिवसात जिल्ह्यात जवळपास दररोज एक शेतकरी आत्महत्या करत आहे.यावर शासन प्रशासन कोणतीही उपाययोजना करू शकले नाही.

काल शिरूर तालुक्यात 4 जणांचा पावसाच्या कहारामुळे मृत्यू झाला.आज परळी तालुक्यात एक युवकाचा पुरात वाहून जाऊन दुर्दैवी मृत्यू झाला.शासनाने याची दखल घेतल्याचे अजूनतरी दिसून आले नाही,हे दुर्दैवी असून राज्यात सरकार आहे तरी कुठे,असा संतप्त सवाल धनंजय मुंडे यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना उपस्थित केला.

मागील तीन महिन्यांच्या नुकसानीचे दोन वेगवेगळ्या मदतीचे जीआर आले. कोट्यावधी रुपयांच्या मदतीची घोषणा झाली पण त्यात बीड जिल्ह्यात नुकसान झालेच नाही,असा दावा करत सरकारने मदतीपासून वगळले.आता जे समोर दिसते आहे,ते नुकसान पाहूनतरी सरकारच्या मनाला पाझर फुटणार आहे का? असा प्रश्न उपस्थित करत धनंजय मुंडे यांनी सरकारला तातडीने मदतीचा निर्णय घेण्याची विनंती केली आहे.

काल रात्रीपासून परळी मतदारसंघात ढगफुटीसदृश जोरदार पाऊस पडतो आहे.शेतीचे नुकसान पाहून तर मन सुन्न होते आहे.ऐन दिवाळीच्या तोंडावर बळीराजा कोलमडून पडला आहे.राज्य सरकारने काल झालेल्या मंत्री मंडळ बैठकीत अतिवृष्टी बाधित मराठवाडा व विदर्भासाठी काहीतरी ठोस निर्णय घेणे अपेक्षित होते मात्र असे झाली नाही,त्यामुळे लाखो शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार आहे.

धनंजय मुंडे यांनी आज परळी तालुक्यात पावसाने नुकसान केलेल्या वाघबेट,कौठळी,कौठळी तांडा,बेलंबा,इंजेगाव आदी गावांमध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी केली. पावसाने अक्षरशः कहर केला असून,कापूस,सोयाबीन,तूर,मूग,उडीद आदी पिके संपूर्णतः वाया गेली आहेत.काही ठिकाणी नदी काठच्या घरांमध्ये पाणी शिरल्यानेही नुकसान झाले आहे.

घरात पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्य, किराणा,धान्य आदी नुकसान झाले असेल अशा कुटुंबांना तातडीने आकस्मिक निधीतून अर्थ सहाय्य देण्याच्या सूचना मुंडे यांनी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना केल्या आहेत. तसेच शेतीच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे तत्काळ पूर्ण करून शासनास पाठवावेत, अशाही सूचना त्यांनी केल्या.

यावेळी वैद्यनाथ कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेवराव आघाव, राष्ट्रवादी काँग्रेस युवक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष अजय मुंडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण तात्या पौळ, प्रा.मधुकरराव आघाव, युवा नेते अभय मुंडे,पं.स.सभापती पिंटू मुंडे,अमरनाथ गित्ते,मारुतीराव कराड,दिलीपदादा कराड,रमेश गित्ते,अमोल कराड,संजय गित्ते,रावसाहेब चव्हाण,उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे,तहसीलदार सुरेश शेजुळ,यांसह संबंधित मंडळांचे मंडळ अधिकारी,तलाठी,यांसह पदाधिकारी व स्थानिक शेतकरी आदी उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS : एलिसा हीलीची खेळी ठरली निर्णायक; रोमांचक सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला धूळ चारली

Dahisar Politics: युतीचा करिष्मा! महापालिका निवडणुकीपूर्वीच महायुतीला धक्का,शेकडो भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश

Bardhaman Station : पश्चिम बंगालमध्ये रेल्वे स्टेशनवर मोठी दुर्घटना; अनेक प्रवासी जखमी, गर्दीचा धडकी भरवणारा व्हिडिओ समोर

Nilesh Ghaiwal: निलेश घायवळला ब्लू कॉर्नर नोटीस, पुणे पोलिसांनी टाकला मोठा डाव

Japan Declares Flu: ४ हजारांहून अधिक रुग्ण, जपानमध्ये शाळा बंद, रुग्णालये फुल्ल

SCROLL FOR NEXT