Dhananjay Munde X (Twitter)
महाराष्ट्र

Dhananjay Munde : धनंजय मुंडेंचा मंत्रिमंडळ घोटाळा? मंत्रिमंडळाची मंजुरी न घेताच टेंडर काढले? पाहा स्पेशल रिपोर्ट

Dhananjay Munde News : घोटाळ्यांचे आरोप मंत्री धनंजय मुंडेंची पाठ सोडायला तयार नाही. मुंडेंवर आता थेट मंत्रिमंडळाची दिशाभूल करण्याचा मोठा आरोप झालाय. माहिती अधिकारात ही धक्कादायक माहिती समोर आल्याचा दावा करण्यात आलाय. नेमकं काय आहे हे प्रकरण त्यावरचा हा विशेष रिपोर्ट.

Vinod Patil

Dhananjay Munde : वाल्मिक कराड प्रकरणात धनंजय मुंडे आधीच अडचणीत सापडले आहेत. त्यात कृषीमंत्री असताना त्यांनी घेतलेल्या निर्णयांवरून त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळाची मंजुरी न घेताच मुंडेंनी अनेक टेंडर काढल्याचा गंभीर आरोप आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केलाय. विजय कुंभार यांनी मुंडेंवर नेमके काय आरोप केले आहेत पाहूयात..

काय आहेत धनंजय मुंडेंवर आरोप?

- मंत्रिमंडळाची मंजुरी न घेताच टेंडर काढले.

- मंत्रिमंडळ बैठकीत अनेक विषय विना परवानगी आणले.

- दिशाभूल करुन बॅटरी ऑपरेटेड-स्प्रे पंप, सोलार लाईट ट्रॅपचा निर्णय.

- वाद झाल्यानं तत्कालीन कृषी सचिव व्ही.राधा यांची तडकाफडकी बदली.

धनंजय मुंडे यांनी मंत्रिमंडळाचा ठराव मंजूर न करून घेता परस्पर 200 कोटी रुपये उचलले असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला होता. त्यानंतर आता सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनीदेखील असाच आरोप केल्यानं धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढल्या आहेत.

राज्य सरकारच्या बहुचर्चित अ‍ॅम्बुलन्स खरेदीसाठी 13 मार्चला ठराव मंजूर करण्यात आला आणि 15 मार्चला शासन आदेश मंजूर करण्यात आले. असा खळबळजनक दावा विजय कुंभार यांनी केलाय. कुंभार यांच्या नव्या आरोपांमुळे मुख्यमंत्री फडणवीस काय भूमिका घेणार आणि या प्रकरणाची तरी चौकशी होणार का? असे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: आई-वडील कामावर गेले, खेळता खेळता मुलं खड्ड्यात पडली; सख्ख्या बहीण-भावाचा बुडून मृत्यू

अभिषेक शर्मानं रचला इतिहास, ICC रँकिंगमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड; कुणालाही जमलं नाही ते करून दाखवलं!

Chanakya Neeti : वैवाहिक जीवनात कटकट, चीडचीड नको; तर 'या' चार गोष्टी लक्षात ठेवा

Maharashtra Live News Update: भांडुपमधील एका सार्वजनिक शौचालयात सापडलं स्त्री जातीचं अर्भक

Election Commission: जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी 13 ऑक्टोबरला आरक्षण सोडत

SCROLL FOR NEXT