Manoj jarange and dhananjay munde Saam tv
महाराष्ट्र

माझ्या नादी लागू नका, जरांगेंचा मुंडेंना इशारा; आता संघर्ष आणखी पेटणार? VIDEO

Manoj jarange and dhananjay munde : मंत्रिपदाकडे डोळे लावलेल्या धनंजय मुंडेंच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे. कारण जरांगेंनी मुंडेंना घेरलंय. नेमके जरांगेंनी काय दावा केलाय ? मुंडेंच्या अडचणीत कशी वाढ होत चाललीय...पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट...

Vishal Gangurde

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात कराड कनेक्शन समोर आल्यानंतर मुंडेंचं मंत्रिपद गेलं. त्यानंतर मुंडेंमागची वादाची मालिका काही थांबायचं नाव घेत नाही.... त्यातच जरांगेंनी एका महिलेचं नावाचा उल्लेख करत धनंजय मुंडेंना घेरलंय.. मुंडेंची 22 पेक्षा जास्त प्रकरणं आपल्याकडे आली आहेत.. त्यामुळे मुंडेंनी माझ्या नादी लागू नये, असा इशाराच जरांगेंनी दिलाय...

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात कराड कनेक्शन समोर आल्यानंतर मुंडेंचं मंत्रिपद गेलं. त्यानंतर मुंडेंमागची वादाची मालिका काही थांबायचं नाव घेत नाही.... त्यातच जरांगेंनी एका महिलेचं नावाचा उल्लेख करत धनंजय मुंडेंना घेरलंय.. मुंडेंची 22 पेक्षा जास्त प्रकरणं आपल्याकडे आली आहेत.. त्यामुळे मुंडेंनी माझ्या नादी लागू नये, असा इशाराच जरांगेंनी दिलाय...

खरं तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडचं नाव आल्यानंतर धनंजय मुंडे चांगलेच अडचणीत आले... त्यानंतर मुंडे विजनवासात गेले होते.. मात्र आता मुंडे पुन्हा राजकारणात सक्रीय झाले.. एवढंच नाही तर मंत्री छगन भुजबळ यांच्या ओबीसी महाएल्गार मेळाव्याला उपस्थित राहत थेट जरांगेंवर हल्ला चढवला.. त्यामुळे जरांगे विरुद्ध मुंडे संघर्ष निर्माण झाला... मात्र महापालिका, झेडपी निवडणुकीनंतर हा वाद निवळण्याची शक्यता असतानाच जरांगेंनी मुंडेंना पुन्हा एकदा घेरलंय.. मात्र आतापर्यंत मुंडे कोणत्या प्रकरणांमुळे अडचणीत आलेत....पाहूयात...

सरपंच हत्या प्रकरणी कराडमुळे मुंडेंचं मंत्रिपद गेलं. त्यानंतर जिल्हा नियोजन विभागाच्या कामात घोटाळा झाल्याचा आरोप करत धसांनी मुंडेंना घेरलं.. एवढंच नाही तर कृषी घोटाळ्याच्या आरोपांनी मुंडे अडचणीत आले होते... तर त्यापाठोपाठ मुंडेंनी आपल्या हत्येची सुपारी दिल्याचा आरोप करत जरांगेंनी मुंडेंना घेरलं. तर दुसरीकडे करुणा मुंडे कौटुंबिक हिंसाचार प्रकरणीही धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ झालीय...

आधीच मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षण प्रकरणावरुन धनंजय मुंडे विरुद्ध मनोज जरांगे संघर्ष रंगला होता... आता पुन्हा एका महिलेच्या पतीच्या मृत्यूप्रकरणी जरांगेंनी नव्याने आरोप केल्यानं जरांगे विरुद्ध मुंडे संघर्ष आणखी टोकाला जाण्याचीच शक्यता आहे....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gairan Land: मनपा-नगरपालिका क्षेत्रातील गायरान जमिनीवरील आरक्षण उठवलं; सरकारचा मोठा निर्णय

US–Iran Conflict: अमेरिका-इराण युद्ध धर्मिक वळणार? डोनाल्ड ट्रम्प यांचा धर्मयुद्धाचा प्लॅन?

Ajit Pawar Plane Crash: जय पवारांची पत्रकार परिषद रद्द? VSR च्या मालकाचा 'बोलविता धनी' कोण?

कुत्र्याने चावा घेतल्याने म्हैस आक्रमक, अनेकांना जमिनीवर पाडलं, हल्ल्यात एकाचा मृत्यू

गाढवं पाळा, तरुण आणि श्रीमंत व्हा? गाढवाच्या कातडीपासून बनतं चमत्कारी औषध?

SCROLL FOR NEXT