Dhananjay Munde News
Dhananjay Munde News Saam Tv News
महाराष्ट्र

Dhananjay Munde News: बीडकरांचं अजित पवारांवरील प्रेम उद्या दिसेल; मंत्री धनंजय मुंडे सभेआधी नेमकं काय म्हणाले? वाचा

विनोद जिरे

Dhananjay Munde Latest News:

अजित पवार गटाची उद्या राज्यातील पहिली जाहीर सभा बीडमध्ये होत आहे. या सभेची अजित पवार गटाने जंगी तयारी केली आहे. या सभेचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली जोरदार नियोजन करण्यात येत आहे. रात्री उशिरा सभा स्थळाची पाहणीदरम्यान, अजित पवारांवरील बीडकरांचं प्रेम उद्याच्या सभेत दिसेल, अशी प्रतिक्रिया मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. (Latest Marathi News)

रात्री उशिरा सभा स्थळाची पाहणीदरम्यान मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. धनंजय मुंडेंकडून राजकीय विधानासाठी 'वेट अँड वॉच'ची भूमिका पाहायला मिळाली. 'जे काही मला बोलायचंय ते मी उद्या बोलेल आणि जे काही आपल्याला अपेक्षित आहे. आपल्याला पाहायला ते मजा येईल. अशी अभूतपूर्व तयारी आमची सुरू आहे, अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी दिली.

'बारामतीकर जेवढे अजितदादांवर प्रेम करतात, त्याच्यापेक्षा गहूभर आगाव बीडकर नक्कीच दादांवर प्रेम करतात. हे आपल्याला नक्कीच उद्याचे या सभेतून दिसून येईल, अशी प्रतिक्रिया मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

सभेचा मंडप कसा आहे?

प्रसिद्ध संजेरी मंडप यांच्या माध्यमातून या सभेचे स्टेज व मंडपाची उभारणी करण्यात येत आहे. 80 बाय 40 फुटांचे भव्य स्टेज तयार करण्यात आले आहे. तसेत पावसाच्या पार्श्वभूमीवर भव्य वॉटर प्रूफ मंडप उभारण्यात आला आहे.

या मंडपात 50 ते 55 हजार लोक बसण्याची क्षमता आहे, महिलांची बसण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त सभास्थळी एकूण 1 लाख पेक्षा अधिक लोक जमतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Termeric Water Benefits: पाण्यात 'हा' पदार्थ मिसळून प्या झटपट वजन कमी करा

Indian Cricket's Net Worth | विश्वविजेत्या भारतीय क्रिकेटर्सच्या संपत्तीचा आकडा ऐकून थक्क व्हाल

Success Story : २० वर्षे बँकेत नोकरी, ५० व्या वर्षी स्वतःचा व्यवसाय; देशातील सर्वात श्रीमंत महिला CEO बद्दल जाणून घ्या!

Dive Ghat Pune : पुण्यातील दिवे घाटात दुचाकीसमोर अचानक बिबट्या आला अन्....पाहा VIDEO

Pandharpur video: VIP दर्शनामुळे भाविकांचे हाल; विठुरायाच्या दर्शनसाठी मोठी गर्दी!

SCROLL FOR NEXT