Dhananjay Munde addressing Banjara community rally demanding tribal reservation rights in Maharashtra. Saam Tv
महाराष्ट्र

Dhananjay Munde: राजकीय कमबॅक की समाजाला न्याय? बंजारा आरक्षणावर धनंजय मुंडेंचं राजकारण?

Political Reasons Behind Dhananjay Munde: राजकीय विजनवासात गेलेले मंत्री धनंजय मुंडे आरक्षणाच्या मुद्द्यावर अचानक आक्रमक का झालेत? बंजारा समाजाच्या मोर्चात जाण्यामागची नेमकी कारणं काय?

Bharat Mohalkar

मंत्रिपद गेल्यानंतर राजकीय विजनवासात गेलेले धनंजय मुंडे आता बंजारा समाजाच्या आदिवासी आरक्षणासाठी आक्रमक झालेत.. हैदराबाद गॅझेटियरनुसार मराठा समाजाला एक आणि बंजारा समाजाला वेगळा असा न्याय का? असा सवालच धनंजय मुंडेंनी केलाय..

मनोज जरांगेंच्या आंदोलनानंतर मराठवाड्यातील कुणबी नोंदी सापडलेल्या मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश झालाय.. त्यामुळे ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी धनंजय मुंडे भुजबळांसोबत एकीची वज्रमूठ आवळत आहेत.. तर दुसरीकडे राजकीय विजनवासात गेलेले मुंडे पुन्हा थेट बंजारा समाजाच्या स्टेजवर पोहोचलेत.. एवढंच नाही तर बंजारा आरक्षणासाठी अखेरपर्यंत लढण्याचा निर्धार त्यांनी जाहीर केलाय.

खरंतर ओबीसी असलेले धनंजय मुंडे VJNT मधील बंजारा समाजाच्या आदिवासी आरक्षणासाठी पुढाकार का घेत आहेत यामागतचं नेमकं काय कारण असू शकतं?

मुंडेंचं राजकारण हे ओबीसीतील माधव म्हणजेच माळी, धनगर आणि वंजारी पॅटर्नपेक्षा वंजारी केंद्रित असल्याचं म्हटलं जातं.. मात्र लोकसभा निवडणुकीआधी मराठवाड्यात जरांगेंच्या आंदोलनामुळे ओबीसी विरुद्ध मराठा असं धृवीकरण झालं आणि त्याचा थेट फटका मुंडेंना बसला.. लोकसभेत पंकजा मुंडेंचा पराभव झाला आणि मुंडेंच्या वर्चस्वाला धक्का बसला.. तर पुढे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचं नाव आल्याने मुंडेंना राजीनामा द्यावा लागला... मात्र जातीय राजकारणामुळेच आपला बळी गेल्याची मुंडेंची भावना आहे... आता मराठा समाजासाठी हैदराबाद गॅझेटियर लागू केल्याने चालून आलेली संधी मुंडेंनी हेरली आणि बंजारा समाजाच्या आदिवासी आरक्षणाची मागणी केली..

मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेटियर लागू करुन सरकारसमोर कायदेशीर पेच निर्माण झाला असला राजकीय कमबॅकसाठी तसंच वंजारी, बंजारा एकगठ्ठा मतं आपल्याकडे वळवण्यासाठी धनंजय मुंडेंनी बंजारा कार्ड खेळलंय का? याचीच चर्चा रंगलीय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जनगणना कामामध्ये कसूर केल्याप्रकरणी शिक्षकावर गुन्हा दाखल

मराठीत जांभूळ तर बंगाली, पंजाबी आणि गुजराती भाषेत काय म्हणतात?

Shocking : कोल्हापूर हादरलं! इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या; धक्कादायक कारण समोर

Shiv Sena Leader Attack: गळाभेटीच्या बहाण्याने जवळ बोलवत गळ्यावर चाकूचा वार; शिवसेना उपजिल्हाप्रमुखावर जीवघेणा हल्ला

LPG Price Today : सीएनजीसारखेच रात्रीत एलपीजी गॅसचे दर बदलले? घरगुती सिलिंडर बुक करण्याआधी दर वाचाच

SCROLL FOR NEXT