Vaidyanath Cooperative Sugar Factory Election : बीडच्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक बिनविरोध झाली आहे. या निवडणुकीत भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी एकत्रित येत कारखान्याच्या आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी बिनविरोध 21 संचालक निवडले आहेत.
लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी स्थापन केलेल्या परळी तालुक्यातील पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदाची निवडणूक बिनविरोध झाली. या निवडणुकीसाठी वैद्यनाथ कारखान्याच्या माजी चेअरमन भाजप नेत्या पंकजा गोपीनाथ मुंडे आणि राष्ट्रवादीचे माजी मंत्री धनंजय मुंडे हे दोघे बहिण-भाऊ एकत्र आले आहेत. यामुळे 210 सदस्यांचे संचालक मंडळ बिनविरोध निवडून आले आहेत.
पंकजा मुंडे गटाचे 11, धनंजय मुंडे गटाचे 10 उमेदवार
कारखान्याच्या संचालक पदाच्या 21 जागेसाठी 9 मे रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. संचालक पदाच्या 21 जागेसाठी एकूण 50 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेत 50 पैकी 13 अर्ज नामंजूर झाले होते. तर 37 अर्ज मंजूर झाले.
आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी खा. प्रीतम मुंडे यांच्यासह 16 जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे 21 जणांचे अर्ज शिल्लक राहीले. यामुळे 21 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली. त्यामध्ये पंकजा मुंडे गटाचे 11 आणि धनंजय मुंडे गटाचे 10 उमेदवार आहेत. (Latest Political News)
बिनविरोध निवडून आलेले 21 उमेदवार:
पंकजा मुंडे, यशश्री मुंडे, केशवराव माळी, वाल्मीक कराड, श्रीहरी मुंडे, रेशीम कावळे, ज्ञानोबा मुंडे, राजेश गीते, सतीश मुंडे, अजय मुंडे, पांडुरंग फड, हरिभाऊ गुट्टे, सचिन दरक, सुरेश माने, वसंत राठोड ,चंद्रकेतू कराड ,शिवाजीराव गुट्टे ,शिवाजी मोरे ,सुधाकर सिनगारे ,सत्यभामा उत्तमराव आघाव, मंचक घोबाळे. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.