Sharad Pawar Meets Cm Eknath Shinde
Sharad Pawar Meets Cm Eknath ShindeSaam Tv

Sharad Pawar Meets Cm Eknath Shinde: मोठी बातमी! शरद पवार मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला, नेमकं काय आहे कारण?

मोठी बातमी! शरद पवार मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला, नेमकं काय आहे कारण?
Published on

Sharad Pawar Meets Cm Eknath Shinde: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहेत. या भेटीमागचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाल्यापासून पहिल्यांदा शरद पवार हे वर्षा निवासस्थानी त्यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. ही भेट नेमकी कशासाठी होत आहे, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पवार आणि शिंदे यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Sharad Pawar Meets Cm Eknath Shinde
Ashadhi Ekadashi 2023: पंढरीच्या आषाढी वारीसाठी टोल माफ! रस्त्यांची दुरूस्ती, चोख नियोजन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते, याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे. यातच राज्यातला असा कोणता मुद्दा आहे, ज्यासाठी शरद पवार हे स्वतः शिंदे यांच्या भेटीसाठी गेले आहेत, याबद्दल चर्चा रंगू लागली आहे.  (Latest Marathi News)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार यांनी आज मुख्यमंत्री शिंदे यांना भेटण्यासाठी वेळ मागितली होती. मुख्यमंत्री शिंदे गेट ऑफ इंडिया येथे एका कार्यक्रमासाठी उपस्थित होते. येथून ते थेट वर्षा निवासस्थानी आले आहेत. त्यांच्याआधी शरद पवार या ठिकाणी पोहोचले.

Sharad Pawar Meets Cm Eknath Shinde
Bloomberg Billionaires Index: इलॉन मस्क पुन्हा ठरला जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, मुकेश अंबानी कितव्या क्रमांकावर?

मराठा मंदिर संस्थेला ७५ वर्ष पूर्ण झाली असून या कार्यक्रम मुख्यमंत्री उपस्थित राहावे असे एक आमंत्रण देण्यासाठी शरद पवार यांनी शिंदेंची भेट घेतली, अशी माहिती देखील सूत्रांनी दिली.

दरम्यान, महाविकास आघाडीत शरद पवार यांची अत्यंत महत्वाची भूमिका आहे. अशातच शरद पवार यांनी शिंदे यांची भेट घेतल्याने राजकीय वातावरणात वेगवगेळ्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. याआधी जेव्हा शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत होते, त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी पवार यांच्या बंगल्यावर जाऊन त्यांची भेट घेतली होती. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर पवार यांनी पहिल्यांदाच वर्षा बंगल्यावर त्यांची भेट घेतल्याने अनेक राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com