dhananjay munde Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : 'राजकारण नाही, मलाच संपवण्याचा डाव';धनंजय मुंडेंचे विरोधकांवर टीकास्त्र, VIDEO

Maharashtra Political News : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला एक वर्ष पूर्ण झालं आणि दुसरीकडे धनंजय मुंडेंनी विरोधकांवर गंभीर आरोप केलेत... त्यामुळे मुंडेंना संपवण्याचा डाव कोण आखतयं... बीडचं राजकारण का तापलयं? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Suprim Maskar

परळी नगरपरिषदेच्या निवडणुक प्रचारात धनंजय मुंडेंनी खळबळजनक दावा केलाय.विरोधक आता केवळ माझं राजकारणच नाही, तर मलाच संपवण्याच्या मागे लागलेत... असं विधान करत मुंडेंनी थेट विरोधकांवर निशाणा साधलाय...

दुसरीकडे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला वर्ष पूर्ण झाल्यानं अनेक नेत्यांनी मस्साजोगमध्ये सभा घेतली.. त्यावेळी डाव टाकण्याचं काम फक्त धनंजय मुंडे करतात, असं म्हणत जरांगेंनी मुंडेंवर हल्लाबोल केलाय..तर काही जण काय़द्यापासून पळवाटा शोधतायत, असा म्हणत सुरेश धसांनी पुन्हा एकदा मुंडेंवर प्रहार केलाय..

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुरेश धस आणि जरागेंनी मुंडेंवर गंभीर आरोप केले होते.. त्यानंतर वाल्मिक कराडच्या अटकेनंतर मुंडेंना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. अशातच परळी नगरपरिषदेच्या निवडणुकीत आधी मुंडेंनी कराडची आठवण काढली आणि आता थेट विरोधकांना टोला लगावलाय.. त्यामुळे मुंडेंना संपवण्याचा डाव कोण आखतयं? परळी नगरपरिषदेत एक्टिंव झालेले मुंडे विरोधकांना चितपट करण्यासाठी कोणती रणनीती आखतात.. हे पाहणं महत्त्वाचं आहे..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yoga For Weight Loss: डाएट आणि एक्सरसाइझ करूनही वजन कमी होत नाही? मग रोज २० मिनिटं करा 'हा' एक योगा

Maharashtra News Live Update: पालघरमध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या १३ जणांची सुखरूप सुटका

Farmer Loan Waiver Scheme: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ६१ हजार ९०० शेतकऱ्यांना ५२३ कोटींचा लाभ

Viral News : ज्या बॉसला किडनी दिली त्यानेच महिला कर्मचाऱ्याला नोकरीवरून काढलं

Diabetes Care in Monsoon: पावसाळ्यात ब्लड शुगर नियंत्रणात ठेवायची आहे? मग, या ७ गोष्टींची नक्की घ्या काळजी

SCROLL FOR NEXT