Dhananjay Deshmukh  Saam Tv
महाराष्ट्र

वाल्मिक कराडच्या मुलाच्या पोस्टवरून नवा वाद; धनंजय देशमुख भडकले, काय म्हणाले? वाचा

walmik karad news : वाल्मिक कराडच्या मुलाच्या पोस्टवरून नवा वाद झाला आहे. या पोस्टवर धनंजय देशमुख यांनी टीका केली.

Vishal Gangurde

योगेश काशिद, साम टीव्ही

बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण पुन्हा एकदा तापलं आहे. आरोपी वाल्मिक कराडच्या मुलाने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे बीडमधील सामाजिक वातावरण ढवळून निघालं आहे. आरोपी कराडचा मुलगा सुशीलने केलेल्या पोस्टवर धनंजय मुंडे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. धनंजय देशमुख म्हणाले, सोशल मीडियावर पोस्ट टाकण्यापेक्षा समोर येऊन सत्य सांगावे. कोणाच्या आश्रयाने हिंमत आली? कोण दिली ताकद?” असा थेट सवाल धनंजय देशमुख यांनी केला. न्यायालय, शासन आणि मुख्यमंत्र्यांनाही चॅलेंज करण्याची भाषा होत असल्याचा आरोप देखील धनंजय यांनी केला. बेल अर्जापासूनच मिरवणुकीचे स्वप्न पाहिले जात होते, असा टोलाही त्यांनी लगावला.

सुशील कराडने काय पोस्ट केली होती?

आरोपी वाल्मिक कराडच्या मुलाचं नाव सुशील कराड असे आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड याच्यावर आरोप झाला. तेव्हापासून वाल्मिक कराड हा जेलमध्ये आहे. आता त्याच्या मुलाने सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. त्याची पोस्ट चांगलीच व्हायरलं झाली. ‘आता मात्र सर्वांसमोर सर्व काही बोलणार ‘ असं सुशील कराडने म्हटलं. त्यामुळे आता सुशील कराड काही गौप्यस्फोट करणार का? याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं होतं.

वाल्मिक कराडचा सुप्रीम कोर्टातही जामीन फेटाळला

वाल्मीक कराडने हायकोर्टात जामीन अर्ज फेटाळल्यानंतर सुप्रीम कोर्टात अर्ज केला होता. सुप्रीम कोर्टात जामीन अर्ज फेटाळल्याने पुढील एक वर्षासाठी वाल्मीक कराड जेलमध्येच असणार आहे. वाल्मीक कराडला एक वर्षानंतर नवीन जामीन अर्ज दाखल करण्याची मुभा देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात राजस्थानच्या तिघांकडून ७८ हजारांचे अफीम जप्त; तस्करीचे रॅकेट उघडकीस

आमदारांच्या पाहणी दौऱ्यात सुपरवायझरला मारहाण; भाजप नेत्यासह चौघांवर गुन्हा दाखल; राज्यात खळबळ

Pathology lab reports: रिपोर्टवर सही करणारे डॉक्टर प्रत्यक्षात तपासणी करतात का? ‘घोस्ट पॅथॉलॉजिस्ट’ प्रकारामुळे रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

Turmeric Price : मोठी बातमी! हळदीने गाठला विक्रमी उच्चांक; ९ वर्षांनंतर भाव थेट 'तितक्या' हजारांवर

Sabudana Vada Recipe : १० मिनिटांत बनवा कुरकुरीत साबुदाणा वडे, पाहा सोपी ट्रिक

SCROLL FOR NEXT