Devendra Fadnavis News
Devendra Fadnavis News Saam tv
महाराष्ट्र

Devendra Fadnavis: 'मेळघाट हाट'चा आदिवासी क्षेत्रातील महिलांना निश्चित लाभ होईल; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास

साम टिव्ही ब्युरो

Devendra Fadnavis News:

मेळघाटातील आदिवासी महिला भगिनींच्या बचत गटांद्वारे उत्पादित वस्तूंच्या विक्री व मार्केटिंगसाठी 'मेळघाट हाट'चा प्लॅटफॉर्म प्रशासनाने उपलब्ध करुन दिला आहे. या विक्री केंद्राचा आदिवासी क्षेत्रातील महिलांना निश्चितच लाभ होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीत येथे व्यक्त केला. (Latest Marathi News)

फडणवीसांनी दिली महिला बचत गटाला भेट

अमरावतीमधील महिला बचत गटांचे उत्पादन विक्री केंद्राच्या भेटी दरम्यान फडणवीस बोलत होते. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मेळघाट हाटच्या माध्यमातून आदिवासी क्षेत्रातील उत्पादित साहित्याला हक्काचे विक्री केंद्र मिळाले आहे. या बचतगटातील महिलांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे.

'विक्रीसाठी आणलेल्या साहित्यांना योग्य भाव मिळण्यासाठी त्यांचे उत्तम मार्केटिंग, पॅकिंग व ब्रँडिंग करावे. प्रशासनाच्या या अभिनव उपक्रमामुळे महिला महिला सक्षमीकरणासह आदिवासी महिला बचत गटांना निश्चितच प्रोत्साहन मिळेल, असे त्यांनी सांगितले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मेळघाट हाट विक्री केंद्र म्हणजे काय?

अमरावतीत महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी मेळघाट हाट विक्री केंद्र सुरू करण्यात आलं आहे. या केंद्रात 47 प्रकारच्या विविध वस्तू विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. प्रथम टप्प्यात एकूण 60 स्वयंसहाय्यता महिला बचत गटांच्या उत्पादनाचा समावेश करण्यात आला आहे.

यात तृणधान्यांमध्ये सावा, कुटकी, ज्वारी, बाजरी तसेच कडधान्य, गहू, लाल तांदुळ, तूर दाळ, विविध प्रकारची लोणची, चिखलदऱ्यात उत्पादित होणारी प्रसिध्द कॉफी, मध, तूप, गृहशोभेच्या वस्तू, आरोग्याच्या दृष्टिकोनातून पौष्टिक खाद्यान्ने विविध उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

हनुमान गढीला उपमुख्यमंत्री यांनी दिली भेट

हनुमान गढी येथे कारसेवक सत्कार समारंभात देवेंद्र फडणवीस यांनी आज भेट दिली. या समारंभात राम मंदिर निर्माण कार्यात योगदान दिलेल्या जिल्ह्यातील कारसेवकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी फडणवीस यांचेही कारसेवक म्हणून खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी सत्कार केला. त्यानंतर येथे उभारण्यात येणाऱ्या 111 फूट हनुमान पुतळ्याच्या चरणाचे पूजन उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunny Leone: 'बेबी डॉल'चा ग्लॅमरस लुक

Shreya Bugde: श्रेया बुगडेची पतीसोबत जम्मू काश्मीर स्वारी, Photos पाहा

Worli Hit And Run Case: अडीच वर्ष काय घडलं सांगू का? आता राजकारण नको; मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना नाव न घेता इशारा

Hingoli News : हिंगोलीत शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीचे कार्यालय फोडलं; तांत्रिक अडचण दूर होत नसल्याने शेतकरी आक्रमक

Electric Shock Safety: पावसात विजेचा झटका लागू नये यासाठी काय करावे? विद्युत सुरक्षेसाठी वीज कंपन्याचा काय आहे सल्ला?

SCROLL FOR NEXT