Devendra Fadnavis News Saam tv
महाराष्ट्र

Devendra Fadnavis News: 'एसटीने प्रवास केला, कधीही मंत्रिपदाच्या मोहात अडकले नाहीत'; फडणवीसांकडून आबासाहेब देशमुखांच्या आठवणींना उजाळा

Devendra Fadnavis on ganpatrao deshmukh: सांगोल्यातील दिवंगत माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

साम टिव्ही ब्युरो

Devendra Fadnavis News: सांगोल्यातील दिवंगत माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. दिवंगत गणपतराव देशमुख आमदार असतानाही एसटीने प्रवास करायचे. ते कधीही मंत्रिपदाच्या मोहात अडकले नाहीत, असं म्हणत फडणवीसांनी आबासाहेब देशमुखांच्या कार्याचा आढावा सांगत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. (Latest Marathi News)

सांगोल्यातील दिवंगत माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या पुतळ्याचा अनावरण या कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शरद पवार आहेत तर देवेंद्र फडणवीस हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांनी उपस्थितांशी संवाद साधला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'राजकारणातलं शाश्वत सत्य म्हणजे आबासाहेब देशमुख आहेत. विधीमंडळात त्यांनी कामगार, शेतकरी, वंचिताचे प्रश्न मांडले. शरद पवार यांनी त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये गणपतराव देशमुख यांना मंत्रिपदाची संधी दिली होती. त्यांनी एसटीने प्रवास केला कधीही मंत्रिपदाच्या मोहात अडकले नाहीत. मला सभागृहात वीस वर्षे त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. एकलव्य म्हणून त्यांच्याकडून मला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या'.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, आबासाहेबांच्या भाषणातून दिशा मिळायची. आबासाहेब देशमुखांचे भाषण सदस्य कान लावून ऐकायचे. कष्टकरी, गरीबांची व्यथा आबासाहेब देशमुख सभागृहात मांडायचे. आबासाहेबांनी कधीही सुटी घेतली नाही. आबासाहेब हे वनमॅन आर्मी होते. विरोधी पक्षात असताना प्रश्नाची सोडवणूक करताना योग्य प्रकारे भूमिका मांडायचे. विधानमंडळाची उंची आबासाहेबांसारख्या लोकांमुळे आहे. आबासाहेबांच काम प्रेरणा देणारं आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मोठी बातमी! शिंदे ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत? खासदार थेट शिंदेसेनेच्या व्यासपीठावर

Pasta Recipe: हॉटेलमध्ये ३०० रुपयांना मिळणारा पास्ता १० मिनिटांत बनवा घरीच्या घरी, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणातील पालकांवर सीबीआयचे लक्ष

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंनी बच्चू कडूंवर सोपवली मोठी जबाबदारी; विदर्भात भाजपचं टेन्शन वाढणार?

Mumbai Tourism: मुंबईजवळचं महाबळेश्वरसारखं थंडगार वातावरण अनुभवायचं? मग 'हे' 80 किमी अंतरावरचं ठिकाण पाहाच

SCROLL FOR NEXT