Tanaji Sawant on Kalwa Hospital: चौकशी समिती तयार, अहवाल येताच कारवाई करणार; कळवा रुग्णालयातील प्रकारावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

'अहवाल येताच कारवाई केली जाईल. या प्रकरणी चौकशी समिती तयार करण्यात आली असून चौकशी अहवाल मागवला आहे, अशी प्रतिक्रिया आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे.
Tanaji Sawant on Kalwa Hospital
Tanaji Sawant on Kalwa HospitalSaam tv
Published On

अक्षय बडवे

Tanaji Sawant News: ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच रात्रीमध्ये १७ रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या घटनेवर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

'अहवाल येताच कारवाई केली जाईल. या प्रकरणी चौकशी समिती तयार करण्यात आली असून चौकशी अहवाल मागवला आहे, अशी प्रतिक्रिया आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)

आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी राज्यातील विविध मुद्द्यांवर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आरोग्यमंत्री तानाजी सावंत म्हणाले, 'मी सातत्याने या घटनेची माहिती घेत आहे. मी स्वतः तिथल्या आयुक्तांशी बोलत आहे. वैद्यकीय शिक्षण या अंतर्गत ते हॉस्पिटल येते. ही घटना कशामुळे घडली, याचा अहवाल १,२ दिवसांत येईल. १३ जणांचा मृत्यू हा आयसीयूमध्ये झाला आहे. तर इतर ४ हे जनरल वार्डमधील आहेत. डीनचे दुर्लक्ष झालं का हे पाहावं लागेल, पण अतिशय दुर्दैवी घटना आहे'.

Tanaji Sawant on Kalwa Hospital
Jitendra Awhad On Kalwa Hospital: 'या रुग्णालयात फक्त येण्याचा मार्ग, बाहेर जाण्याचा नाही', जितेंद्र आव्हाडांची संतप्त प्रतिक्रिया; मनसेही आक्रमक

'या प्रकरणाचा अहवाल येताच नक्की कारवाई होईल. हे प्रकरण कशामुळे झालं आहे, याच्या मुळापर्यंत आम्ही जाणार आहोत. आता चौकशी समिती तयार करण्यात आली आहे. या प्रकरणाचा चौकशी अहवाल मागवला आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि गिरीश महाजन हे दोघे ही लक्ष ठेऊन आहेत, असेही ते म्हणाले.

दरम्यान, कळवा रुग्णालय प्रकरणावर जितेंद्र आव्हाड यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या रुग्णालयातील प्रशासन बेशिस्त आहे, असा आरोप आव्हाड यांनी केला आहे. या आरोपावर आरोग्यमंत्री तानाजी सावंत म्हणाले, 'आज राज्यात २२ मृत्यू होतात, याठिकाणी राजकीय भाष्य करणे उचित नाही. या प्रकरणी कठोर कारवाई केली जाणार आहे'.

Tanaji Sawant on Kalwa Hospital
Sanjay Raut On Eknath Shinde: '२०१९ मध्ये एकनाथ शिंदेंमुळे युती तोडली', संजय राऊतांचा मोठा दावा

तसेच डोळ्यांच्या साथीवर आरोग्यमंत्री सावंत म्हणाले,'आमच्याकडून पूर्ण तयारी आहे. पथके तयार करून यासंदर्भात मोहीम राबवली जात आहेत'.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com