CM Devendra Fadnavis On Local Body Election saamtv
महाराष्ट्र

Maharashtra Election: मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आयोगाचे पुन्हा कान टोचले, म्हणाले - 'अशी निवडणूक पहिल्यांदाच पाहतोय...'

CM Devendra Fadnavis On Local Body Election: राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा निकाल पुढे ढकलण्यात आला आहे. नागपूर खंडपीठाने आजच्या सुनावणीदरम्यान हा मोठा निर्णय घेतला. कोर्टाच्या या निर्णयावर प्रतिक्रिया देत मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली.

Priya More

नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा निकाल पुढे ढकलण्यात आला आहे. मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने आजच्या सुनावणीदरम्यान हा मोठा निर्णय दिला. सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणूक निकाल २१ नोव्हेंबरला लागेल असं खंडपीठाने सांगितले. कोर्टाच्या या निर्णयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केली. त्याचसोबत त्यांनी निवडणूक आयोगाचे पुन्हा कान टोचले. 'पहिल्यांदा अशी निवडणूक पाहतोय. हे यंत्रणेचे अपयश आहे.', असे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले. मतमोजणी लांबणीलाही मुंख्यमंत्र्यांनी विरोध केला आहे.

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, 'ही पद्धत योग्य वाटत नाही. पहिल्यांदा अशी निवडणूक पाहतोय. हे यंत्रणेचे अपयश आहे. यासंदर्भात माझी वैयक्तीक नाराजी मी काल बोलून दाखवली. खंडपीठाने दिलेला निकाल असेल तर सर्वांना मान्य करावा लागेल. २४ जागांसाठी मतमोजणी पुढे ढकलणे हे मला योग्य वाटत नाही. अजूनही निवडणुका घ्यायच्या आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने प्रक्रियेत सुधारणा करावी.'

तसंच, 'ज्याठिकाणी सगळ्या गोष्टी फॉलो झाल्या आहेत. अशा ठिकाणी कुणी तरी कोर्टात गेले कोर्टाने त्याला दिलासा दिला नाही पण त्यावरून निवडणुका पुढे ढकलणे हे योग्य नाही. गेली २५ ते ३० वर्षे मी निवडणुका लढवत आहे पण हे पहिल्यांदा घडत आहे. घोषीत केलेल्या निवडणुका पुढे ढकलणे, निकाल पुढे ढकलणे हे काय चालले आहे. हे मला काही योग्य वाटत नाही. जे उमेदवार मेहनत घेतात त्यांना फटका बसत आहे.', असे देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यातील भोंदू बाबा आणि वेदिका पंढरपूरकर प्रकरणी मोठी अपडेट

Nashik Crime Bhushan Londhe: उत्तर प्रदेशातही 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला'; कुख्यात गुंडाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका वनडे सामना सुरू असतानाच भारतीय क्रिकेटपटूनं अचानक घेतला संन्यास, भावुक पोस्ट

Marathi Ukhane: लग्नात नववधुसाठी एकापेक्षा एक भन्नाट उखाणे

MMS Viral: १९ मिनिटांच्या व्हिडीओतील तरुणीची आत्महत्या? VIDEO मुळे सोशल मीडियावर खळबळ; नेमकं सत्य काय?

SCROLL FOR NEXT