अकोल्यात पुन्हा एकदा मुख्यमंत्री फडणवीसांची 'लाडक्या बहिणीं'ना साद
तुमचा 'देवाभाऊ' मुख्यमंत्री असेपर्यंत ही योजना कुणीच बंद करू शकणार नसल्याची दिली पुनश्च: ग्वाही.
लहान महापालिकांचा ३० टक्के वाटा राज्य सरकारच भरणार
अक्षय गवळी, अकोला
अकोल्यात आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लाडक्या बहिणींना साद घातलीय. आपण मुख्यमंत्री असेपर्यंत कुणीही 'लाडकी बहीण योजना' बंद करू शकणार नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी केलाय.
आज देवेंद्र फडणवीस अकोल्यात भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या युतीच्या प्रचार सभेला आले होतेय. अकोल्यातील क्रिकेट क्लब मैदानावर त्यांची सभा झालीय. यावेळी मंचावर पालकमंत्री आकाश फुंडकर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी, भाजपचे आमदार रणधीर सावरकर, प्रकाश भारसाकळे, हरिष पिंपळे वसंत खंडेलवाल यांच्यासह दोन्ही पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होतेय.
अकोल्यात मोठी घोषणा करताना देवेंद्र फडणवीसांनी राज्यातील लहान महापालिकांना आनंदाची बातमी दिलीय. यापुढे राज्य सरकारच्या विकास योजनांमधील लहान महापालिकांचा ३० टक्के वाटा राज्य सरकारचसभरणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय. त्यामुळे अनेक विकास योजनांमध्ये आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे विकास वाटाणा भरू न पाहणाऱ्या महापालिकांचा यामध्ये फायदा होणारेय.
अकोलेकरांचा आशिर्वाद घेण्यासाठी मी आलो आहे.
आजची गर्दी पाहून माझ्या मनात आम्ही 60 प्लस जागा घेऊ यात कोणतीच शंका नाही.
महाराष्ट्र देशात दुसर्या क्रमांकाचं नागरीकरण झालेलं राज्य.
या राज्यातील नागरी भागातील राहणार्या लोकांच्या जीवनावर परिणाम करणारी ही निवडणूक.
आधीच्या राज्यकर्त्यांनी शहरांकडे दुर्लक्ष केल्याने आजही नागरी सुविधांची वाणवा. झोपडपट्ट्या, नाल्या, कचरा आणि दुर्गंधी अशा समस्या होत्या.
2014 मध्ये मोदींचं सरकार आल्यावर यामध्ये बदल सुरू.
या देशाच्या इतिहासात पहिल्यांदा मोदींनी शहरांसाठी योजना सुरू केल्यात. शहरांना लाखो कोटी दिलेत.
2017 मध्ये अकोल्याची सत्ता तुम्ही आम्हाला दिली होती.
आता हद्द्वाढ क्षेत्रातील राहिलेले 143 कोटी लवकरच देऊ. हे पैसे मविआ सरकारने थांबवले होते.
यापुढे छोट्या महापालिकांना द्यावा लागणारा विकास योजनांतील 30 टक्के हिस्सा यापुढे राज्य सरकार देईल.
अकोल्याच्या विमानतळाची धावपट्टी पुढच्या काळात 2800 मीटरची करण्याचा प्रयत्न करणार.
पुढच्या काळात अकोल्याचं ग्रामदैवत असलेल्या राजराजेश्वर मंदिराचा विकास आराखडा पुर्ण करणार. त्यासाठी 50 कोटी दिलेत.
महायुतीला 232 जागा मिळाल्यानंतर लाडकी बहीण योजना बंद करतील असं विरोधक म्हणायचे. मात्र, जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही.
15 जानेवारीपर्यंत तुम्ही आमची काळजी घ्या. 16 जानेवारीपासून आम्ही तुमची काळजी घेऊ.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.