Devendra Fadnavis Saam TV
महाराष्ट्र

उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी केलं मोठं ट्विट, म्हणाले...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया दिली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणाला गेल्या काही दिवसांपासून वेगळं वळण लागलं होतं. एकनाथ शिंदे गट आणि महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये जोरदार सत्तासंघर्ष सुरु होता. मात्र,उद्धव ठाकरे यांनी काल मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याने राज्यात भाजप आणि एकनाथ शिंदे गटाची सत्ता येईल, हे जवळपास निश्चितच झालं होतं. याच पार्श्वभूमीवर आज ३० जूनला अखेर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदासाठी शपथ घेतली. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया दिली आहे. एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून पक्षाच्या आदेशाचे मी पालन करतो. ज्या पक्षाने मला सर्वोच्च पद दिले, त्या पक्षाचा आदेश मला शिरोधार्य आहे, असं ट्विट फडणवीस यांनी केलं आहे.

भाजपकडे संख्याबळानुसार देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री होऊ शकले असते, पण फडणवीसांनी मनाचा मोठेपणा दाखवला आणि बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला पाठिंबा दिला, असं विधान एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी माध्यमांशी बोलताना केलं होतं. त्यानंतर आता शिंदे यांनी ट्विटरच्या माध्यमातूनही प्रतिक्रिया दिली आहे. हा वंदनीय हिंदूहृदयसम्राट बाळसाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या विचारांचा व धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या शिकवणीचा विजय…! महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी कायम कटीबद्ध..., असं आश्वासन शिंदे यांनी ट्विटरवरच्या माध्यमातून दिलं आहे.

तसेच शिंदे यांनी ट्विट करुन भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचेही आभार मानले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, गृहमंत्री अमित शाहजी, भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डाजी, देवेंद्र फडणवीसजी व चंद्रकांतदादा पाटील यांचे मनःपूर्वक आभार…, असंही ट्विट शिंदे यांनी केलं आहे.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: ठाणे स्टेशन स्थानकात रेल्वे प्रवाशांची तुफान गर्दी

Crime : बायकोचं अनैतिक संबंध असल्याचा संशय, नवऱ्याने जावयाच्या मुलाचा प्रायव्हेट पार्टच कापला

Rashmika Mandanna : रश्मिका मंदानाचा ‘Thama’मधील ग्लॅमरस लूक पाहून चाहते थक्क; पोस्टर प्रदर्शित

ठाण्यात पावसाचा धुमाकूळ, शाळा सोडल्या; विद्यार्थ्यांना बोटीतून नेलं, पाहा VIDEO

Aadesh Bandekar Son: आदेश बांदेकरांचा लेक लवकरच अडकणार विवाह बंधानात; 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत थाटणार संसार

SCROLL FOR NEXT