Devendra Fadnavis news  saam tv
महाराष्ट्र

Devendra Fadnavis News : ठाकरे-केजरीवाल भेटीवर फडणवीसांचं टीकास्त्र; म्हणाले...

उद्धव ठाकरे आणि अरविंद केजरीवाल यांच्या भेटीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेलक्या भाषेत टीका केली आहे.

Vishal Gangurde

Devendra Fadnavis News: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे मुंबई दौऱ्यावर असून आज उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेलक्या भाषेत टीका केली आहे. (Latest Marathi News)

देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'केजरीवाल आणि उद्धव ठाकरे भेट होवून त्यांना एकमेकांची गरज लागत आहे. भाजपला पराभूत करण्यासाठी केजरीवाल कोणाशी ही हात मिळवायला तयार आहेत. उद्धव ठाकरे कोणासोबत देखील बसायला तयार आहेत'.

'या दोघांच्या भेटीवरून भाजपची ताकद दिसत आहे. मात्र, २०१९ साली हा प्रयोग केला असून हा कधीही यशस्वी झाला नाही. आता देखील होणार नाही, अशी टीका फडणवीसांनी केली.

जलयुक्त शिवारावर बोलताना फडणवीस म्हणाले, 'जलयुक्त शिवारच्या दुषऱ्या टप्प्याची सुरुवात झाली आहे . आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेचा आढावा घेण्यात आला आहे.जास्तीत जास्त जमीन सिंचनाखाली यावी हे ध्येय आहे'.

'राज्यातील सर्व जिल्हे आता काम करणार आहेत. गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या योजनेला देखील गती देण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.

'शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी यासाठी आपण सोलार स्टिटमची योजना हाती घेतली. पडीक जमीन ५० हजार एकरी आम्ही देत आहोत. बँकांना वारंवर लक्षात देऊनही काही बँक सिबिल स्कोरची मागणी करत आहे, यांवर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिलेली आहे, असेही फडणवीस म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: लोकसभेनंतर विधानसभेतही जोगेश्वरीमध्ये फेर मतमोजणीची मागणी

IIM Placement: 'IIM मुंबई' लय भारी; आतापर्यंत २७६ मुलांची कॅम्प्स प्लेसमेंटद्वारे भरती; मिळाले लाखोंचे पॅकेज

Prathamesh Parab Movie: 'आली मधुबाला' प्रथमेश परबच्या चित्रपटातील पहिलं गाणं रिलीज

Akhil Akkineni Engagement: नागार्जुनच्या धाकट्या मुलाने गुपचूप उरकला साखरपुडा, कोण आहे भावी सून? पाहा PHOTOS

Grah Gochar: डिसेंबर महिन्यात ७ ग्रह करणार गोचर; 'या' राशींना मिळणार छप्परफाड पैसा

SCROLL FOR NEXT