Mumbai Water Supply: मुंबईकरांवर भीषण पाणीटंचाईचं संकट; धरणांमध्ये केवळ इतकाच टक्के पाणीसाठा शिल्लक

Mumbai Water Supply News: मुंबईकरांचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. एकीकडे उन्हाचा तडाखा जाणवत असताना दुसरीकडे मुंबईकरांवर भीषण पाणीटंचाईचं संकट ओढवण्याची शक्यता आहे.
Mumbai Water Supply News
Mumbai Water Supply NewsSaam TV

Mumbai Water Supply News: मुंबईकरांचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. एकीकडे उन्हाचा तडाखा जाणवत असताना दुसरीकडे मुंबईकरांवर भीषण पाणीटंचाईचं संकट ओढवण्याची शक्यता आहे. कारण, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये केवळ १९.५ टक्केच पाणीसाठी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत मुंबईकरांसमोर पाणीटंचाईचं संकट उभं राहण्याची शक्यता आहे.  (Breaking Marathi News)

Mumbai Water Supply News
Kishor Aware Case: किशोर आवारे हत्या प्रकरणात मोठी अपडेट; पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड

देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईला (Mumbai News) जवळपास ७ धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. अप्पर वैतरणा धरण, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी धरण हे मुंबईकरांचे तहान भागवतात. मात्र, आता या सर्व धरणामध्ये सरासरी १९.५ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. (Latest Marathi News)

विशेष बाब म्हणजे, गेल्यावर्षी २०२२ साली याच महिन्यात याच काळात धरणांमध्ये २३ टक्के पाणीसाठा होता. दरम्यान, ही परिस्थिती लक्षात घेता, मुंबई महापालिकेने राज्य सरकारला अतिरिक्त पाणीसाठा मिळावा यासाठी पत्र लिहून मागणी केली असल्याची माहिती समोर आहे.

Mumbai Water Supply News
Buldhana News: एकाच दिवशी दोन जणांनी उचललं टोकाचं पाऊल; भयानक घटनेनं अख्खं गाव हळहळलं

अप्पर वैतरणा आणि भातसा धरणातील शिल्लक पाणी हे मुंबईसाठी द्यावे अशा प्रकारची मागणी राज्य सरकारकडे मुंबई महापालिकेने केली आहे. त्यामुळे मुंबईकरांनी आता पाणी जपून वापरण्याची गरज आहे. तसेच येत्या काळात मुंबईकरांच्या पिण्याच्या पाण्यचा प्रश्न देखील गंभीर होतोय की काय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

मुंबईच्या कोणत्या धरणात किती पाणीसाठा?

अप्पर वैतरणा - १२ टक्के पाणीसाठा शिल्लक

मोडक सागर - २९ टक्के पाणीसाठा शिल्लक

तानसा - ३१ टक्के पाणीसाठा शिल्लक

मध्य वैतरणा - १३ टक्के पाणीसाठा शिल्लक

भातसा -१८ टक्के पाणीसाठा शिल्लक

विहार - ३५ टक्के पाणीसाठा शिल्लक

तुळसी- ३६ टक्के पाणीसाठा शिल्लक

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com