पराग ढोबळे, अमरावती
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात नवनीत राणा यांना दिलासा देत हायकोर्टाचा निर्णय रद्द केला आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर नवनीत राणा यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी स्टेजवरून खुशखबर दिली. त्यानंतर या निर्णयाने पोपटासारखे बोलणाऱ्यांना झापड बसली, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार नवनीत राणा यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी प्रचारालाही सुरुवात केली आहे. आज गुरुवारी अमरावतीत नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ सभा आयोजित केली आहे. या सभेला देवेंद्र फडणवीस यांनीही हजेरी लावली. य सभेत फडणवीसांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.
>> नवनीत राणा यांच्या जातप्रमाणपत्राबाबत जे लोक बोट उचलत होते, त्यांना सुप्रीम कोर्टाने उत्तर दिलं आहे.
>> नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र वैध ठरलं आहे. ३०० वर्षांपूर्वीचे कागदपत्रे मांडली. आता सत्याचा विजय झाला आहे. जे पोपटासारखे बोलत होते, त्यांना झापड बसली आहे.
>> आता सुप्रीम कोर्टाचा आशीर्वाद मिळाला आहे. मतमोजणीच्या दिवशीही जनतेचा आशीर्वाद मिळेल.
>> तुमचे काम जनतेने पाहिले आहे. कितीही दूषणे दिली तरी लक्ष देऊ नका. नवनीत राना यांना बजरंगबलीचा आशीर्वाद लाभला आहे.
>> नवनीत राणा आणि रवी राणा यांनी हनुमान चाळीसा म्हटल्याने तुरुंगात टाकलं. मला उद्धव ठाकरे यांना सांगायचं आहे की, हनुमान चाळीसा पाकिस्तानात जाऊन म्हणायचे का?
>> राहुल गांधी म्हणतात, हिंदू समाजातील शक्ती संपवयाची आहे. आमचा मातृ शक्तीला कोणीच संपवू शकले नाही.
>> आमची शक्ती आई जिजाऊ आहे. राहुल गांधी असो की उद्धव ठाकरे असो हे महाविकास आघाडीचे नेते.. आम्हाला संपवू शकणार नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.