Devendra Fadnavis On Maharera  Saam Tv
महाराष्ट्र

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray: देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा उद्धव ठाकरेंवर सोडलं टीकास्त्र, म्हणाले...

देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा उद्धव ठाकरेंवर सोडलं टीकास्त्र, म्हणाले...

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray: केंद्रातील मोदी सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाल्यानेच्या निमित्ताने संपर्क फोर समर्थन हे अभियान सुरू आहे. समाजातील विविध लोकांकडे जाऊन मोदीजींनी नववर्षात केलेल्या कामकाजाचा आढावा मांडणार आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. नागरपूरमध्ये एका आयोजित सभेत ते बोलत होते.

त म्हणाले, भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता या निमित्ताने जनतेपर्यंत जातोय. साधारणपणे एकदा निवडून दिल्यानंतर हा जनतेच्या प्रतिउत्तरदायी जनप्रतिनिधी असतो. भारतीय जनता पक्षामध्ये आपण केलेलं काम हे लोकांपर्यंत पोहोचवून आपलं उत्तर दायित्व पूर्ण करतो आणि त्यानंतर मतं मागण्याची भाजपच्या कार्यकर्त्यांना सवय आहे आणि आम्ही ते करतोय.

फडणवीस म्हणाले, ''उद्धव ठाकरे यांनी राजकीय संस्कृती कुठे जातंय, याचा विचार करायला पाहिजे. मी काल एक ट्वीट केलं. त्याला मिळालेला समर्थन मला असं वाटतं की, आज पर्यंतचे सगळे रेकॉर्ड तोडणार आहे. त्याच्यावरून तरी उद्धव ठाकरेंनी समजून घ्यायला पाहिजे की लोकांना काय अपेक्षित आहे.'' (Latest Marathi News)

ते म्हणाले, ''मोदीजींच्या नेतृत्वावर लोकांचा प्रचंड विश्वास आहे आणि आत्ताच लोकांनी अमेरिकेची व्हिझिट बघितली. भारताच्या राष्ट्रप्रमुखाला अमेरिकेमध्ये असं समर्थन मिळणं, हा त्या व्यक्तीचा सन्मान नाही. तो देशाचा सन्मान आहे. मोदी हे निमित्त आहे. सन्मान भारताचा होतो. संसदेमध्ये खचाखच भरलेली संसद उभा राहून टाळ्या वाजवतो त्यावेळी भारताचा सन्मान होतो.''

फडणवीस पुढे म्हणाले, ''मी सातत्याने म्हणतोय औरंग्याच्या अवलादी पैदा कुठून होतात, शेवटी महाराष्ट्रात आणि देशात औरंगजेबाच्या रक्त कोणात नाही. या ठिकाणचे जे मुस्लिम आहे, तेही औरंगजेबाचे वंशज नाही. औरंगजेब हा या देशावर राज्य करण्यासाठी हिंदूंवर अत्याचार करण्यासाठी आपल्या माता बहिणींची अब्रू लुटण्यासाठी इथे आला होता.

ते म्हणाले, ''त्याच्या अत्याचाराच्या गाथा या हजारो पाने लिहिता येतील इतक्या. त्याच्या गाथा आहे. त्यामुळे असा औरंगजेब कुठल्या राष्ट्रीय मुसलमानाचा मानक होऊ शकत नाही, जे असे घोषणा देत आहेत. अशा प्रकारच्या औरंग्याच्या अवलादी या नेमक्या कोण आहेत? त्याच्या पाठीमागे कोण आहे? त्याच्या पाठीमागे त्याचा इरादा काय ते महाराष्ट्रात काय घडवून इच्छिता हे देखील लवकर बाहेर येणार.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT