Devendra Fadnavis Statement saam tv
महाराष्ट्र

Devendra Fadnavis on Sharad Pawar: अखेर पवार साहेबांना सत्य सांगावं लागलं, देवेंद्र फडणवीसांचा पलटवार

Devendra Fadnavis Statement: पुन्हा एकदा पहाटेच्या शपथविधीवरून राज्याचं राजकारण रंगलं आहे.

Chandrakant Jagtap

Devendra Fadnavis News: पुन्हा एकदा पहाटेच्या शपथविधीवरून राज्याचं राजकारण रंगलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीविषयी केलेल्या वक्तव्यावर बोलताना शरद पवार यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे. "''आमच्यात अनेक गोष्टींची चर्चा झाली, ही गोष्ट खरी आहे. पण त्यांनी स्वतःच सांगितलं की मी दोन दिवसांनी धोरण बदललं, मग पहाटेची शपथ का घेतली? असं म्हणत पवारांनी फडणवीसांना क्लिन बोल्ड केलं.

त्यानतंर लगेच देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस म्हणाले, "मला अतिशय आनंद आहे की, अखेर पवार साहेबांना सत्य सांगावं लागलं. मी जी गुगली टाकली, त्यामुळे त्यांचं सत्य बाहेर आलं आहे. पण ते अर्धच आलंय, उरलेलं सत्यही मी बाहेर काढीन. एवढंच आहे की त्यांच्या गुगलीमुळे मी बोल्ड व्हायच्या ऐवजी त्याचे पुतणे अजित पवारच बोल्ड झाले. त्यांनी स्वत:च्या पुतण्यालाच बोल्ड केलंय. पण हरकत नाही, उरलेलं सत्यही लवकरंच बाहेर येईल". (Marathi Tajya Batmya)

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा पहाटेच्या शपथविधीचा उल्लेख करत ''2019 मध्ये भाजप-राष्ट्रवादीने सरकार स्थापन करण्याचं ठरलं होतं. सरकार स्थापनेबाबत शरद पवारांसोबतही बैठकही पार पडली होती. त्यानुसार आम्ही तयारी केली. मात्र 3-4 दिवसातच शरद पवार मागे हटले", असा दावा फडणवीस यांनी केला होता. (Latest Political News)

देवेंद्र फडणवीस यांच्या या दाव्यावर बोलताना शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार म्हणाले, ''आमच्यात अनेक गोष्टींची चर्चा झाली, ही गोष्ट खरी आहे. पण त्यांनी स्वतःच सांगितलं की मी दोन दिवसांनी धोरण बदललं. मग पहाटेची शपथ का घेतली? तीही चोरून पहाटे घेण्याचं काय कारण होतं?'' असं म्हणत पवारांनी फडणवीसांना क्लिन बोल्ड केलं. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Post marriage changes women: लग्नानंतर महिलांच्या शरीरात होतात २ मोठे बदल; नव्या अभ्यासातून समोर आली धक्कादायक बाब

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेबाबत महत्त्वाची अपडेट; या शेतकऱ्यांना मिळणार नाही ₹२०००

Puran Poli Recipe : ना वाटण, ना पुरण बनवण्याची कटकट; 'ही' ट्रिक वापरा अन् लुसलुशीत पुरणपोळ्या बनवा

Maharashtra budget session : आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, मुख्यमंत्री 6 मार्चला मांडणार राज्याचा अर्थसंकल्प

Maharashtra Live News Update: लातूर शहरासह ग्रामीण भागात पावसाची हजेरी

SCROLL FOR NEXT