Twitter @Dev_Fadnavis
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस यांनी घेतली केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची भेट

विदर्भात पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स प्रकल्पासाठी टेक्नोफिझिबिलिटी अहवाल तयार करण्याचे केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांचे आदेश

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली : विदर्भात जागतिक दर्जाचे पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स तयार करण्याच्या दृष्टीने तांत्रिक व्यवहार्यता (टेक्नोफिझिबिलिटी) अहवाल तयार करण्याचे निर्देश केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज दिले. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात आज केंद्रीय मंत्र्यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली.Devendra Fadnavis called on Union Petroleum Minister Dharmendra Pradhan

विदर्भात जागतिक दर्जाचे पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स स्थापन करण्यासंदर्भा विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिलने (वेद) दिलेल्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांच्यासमवेत खा. अशोक नेते आणि वेदचे पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते.

विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिलच्या शिष्टमंडळात प्रदीप माहेश्वरी, विनायक मराठे, शिवकुमार राव, नवीन मालेवार आदींचा समावेश होता. यावेळी याबाबत सविस्तर सादरीकरण धर्मेंद्र प्रधान यांच्यासमोर करण्यात आले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 14 जूनला नागपूरमध्ये होते. याच दिवशी या प्रकल्पाचे सविस्तर सादरीकरण त्यांच्यापुढे करण्यात आले होते.

देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याशी फोनवरून या प्रकल्पाबाबत चर्चा केली होती व धर्मेंद्र प्रधान यांनी देखील या प्रकल्पाला सकारात्मक प्रतिसाद दिला होता. आज त्यांनी तांत्रिक व्यवहार्यता अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत त्यामुळे या प्रकल्पाचा आरंभ झाल्याचे बोलण्यात येत आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीनंतर माध्यमांशी सवांद साधला व चर्चिल्या गेल्या बाबींवर प्रकाश टाकला. फडणवीस म्हणले, ही चर्चा अतिशय सकारात्मक झाली, याचा मला आनंद असून केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तत्काळ या प्रकल्पासाठी टेक्नोफिझिबिलिटी अहवाल तयार करण्याचे निर्देश अधिकार्‍यांना दिले आहेत.

याबद्दल मी त्यांचा आभारी असून या प्रकल्पाच्या माध्यमातून विदर्भात अनेक नवीन उद्योग उदयास येतील, गुंतवणूक आणि रोजगार वाढण्यासाठीसुद्धा या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर मदत होणार आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: ₹१५०० की ३००० रूपये, लाडक्या बहिणींच्या खात्यात किती पैसे येणार? जून-जुलै हप्त्याची अपडेट समोर

Maharashtra News Live Update: नाशिक- मुसळधार पावसामुळे पहिने भिलमाळ रस्त्यावर तात्पुरत्या स्वरूपात तयार केलेला पूल वाहून गेला

पावसाळ्यात प्या आलं, लसूण आणि कोथिंबीर सूप; रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचा सोपा उपाय

Dipika Kakar Video : लिव्हर कॅन्सरनंतर दीपिका कक्कर पुन्हा हॉस्पिटलमध्ये; पती शोएबने सांगितले नेमकं काय झाले?

8th Pay Commission: पेंशनर्ससाठी खुशखबर! किमान पेन्शनमध्ये ६७% वाढ आणि वयानुसार १००% वाढीचाही प्रस्ताव

SCROLL FOR NEXT