विनोद जिरे
बीड : बीडच्या (Beed) परळी (Parlil) तालुक्यात असणाऱ्या सिरसाळा गावात, सुसज्ज अशी एमआयडिसी उभी राहणार आहे. यासाठी शासनाने तब्बल 35 हेक्टर गायरान जमीन, औद्योगिक क्षेत्र म्हणून घोषित केली आहे. शासनाच्या याच आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी गेलेल्या महसूल विभाग, पोलीस प्रशासन आणि गेल्या अनेक वर्षांपासून तेथे वास्तव्यास असणाऱ्या, पारधी (Pardhi) समाजातील (Community) महिलांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. Police and women clash in Beed; An angry woman administered poison!
हे देखील पहा -
यावेळी आलेले कर्मचारी जमिनीची मोजणी करत त्या जमिनीवर असणाऱ्या घराची देखील मोजणी करत होते. यादरम्यान त्या जमिनीवर 20 ते 22 वर्षांपासून वास्तव्यास असणाऱ्या कुटुंबातील महिला मुली संतप्त झाल्या होत्या. तर याप्रसंगी अधिकारी व तेथील महिला यांच्यात झालेल्या वादात एका वृद्ध महिलेने विष प्राशन केल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी पोलिसांचा (Police) मोठा फौजफाटा तैनात होता.
यावेळी काही कर्मचाऱ्यांनी आम्हाला मारहाण केली आहे. असा आरोप या महिलांनी केला आहे. आम्ही गेल्या 22 वर्षांपासून या ठिकाणी चोऱ्यामाऱ्या सोडून देऊन मेहनत करून इथं गायरान जमीन पिकवतोय. यंदा देखील पेरलं आहे. मात्र हे कर्मचारी आता आम्हाला या जमिनीतून निघून जा म्हणतात. आम्ही कुठे जावं ? कुठे राहावं ? कसं जगावं ? अशी आर्त हाक पारधी समाजातील महिलांनी दिली आहे.
तर या विषयी सामाजिक कार्यकर्ता सत्यभामा सौंदलमर म्हणाल्या, की गेल्या अनेक वर्षांपासून हे पारधी समाजातील कुटुंब, येथे जमीन करतात. या शासनाने ज्या जमिनीवर धनदांडग्यांचा अतिक्रमण आहे, घरे आहेत ते काढले नाहीत. मात्र या सर्वसामान्य गोरगरिबांची घरे मोडण्यासाठी प्रशासन आलं आहे. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी अगोदर या लोकांची सोय करावी. या लोकांना दुसरीकडे गायरान जमीन द्यावी. अन्यथा या ठिकाणाहून उठणार नाहीत. असा इशारा देत हे सामाजिक मंत्री नाही तर अन्याय मंत्री आहेत. अशी संतप्त प्रतिक्रिया देखील त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान आम्ही या लोकांना बाहेर काढण्यासाठी आलो नसून जमीन मोजण्यासाठी आलो आहोत. या ठिकाणी आमचे कर्मचारी फक्त जमीन मोजताहेत. जोपर्यंत वरिष्ठांकडून आदेश येत नाही, तोपर्यंत आम्ही या लोकांना जमिनी काढणार नाही. अशी माहिती परळी उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे यांनी दिली आहे.
Edited By : Krushnarav Sathe
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.