कोब्रा बटालियनने उभारली ग्रीन आर्मी !

5 जून पासून 206 कोब्रा बटालियन ने वृक्षारोपण करण्यास सुरुवात केली असून 28 जून पर्यत्न 10 हजार वृक्ष लागवड या बटालियनने केली आहे.
कोब्रा बटालियनने उभारली ग्रीन आर्मी !
कोब्रा बटालियनने उभारली ग्रीन आर्मी ! अभिजीत घोरमारे
Published On

अभिजीत घोरमारे

भंडारा - भंडारा Bhandara जिल्ह्यातील धारगाव-चितापुर कॅम्पमध्ये केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या (CRPF) 206 कोब्रा बटालियनने (Cobra Battalion) ग्रीन आर्मी (Green Army) उभारली असून ह्या आर्मीने तब्बल 10 हजार वृक्ष लागवडीचे लक्ष्य पूर्ण केले आहे. देशाच्या रक्षणाबरोबर कोब्रा बटालियनने केलेल्या या महत्वपूर्ण कामाचे कौतुक जिल्ह्यात केले जात आहे. Cobra Battalion Created Green Army!

हे देखील पहा -

देशात कोरोना Corona महामारीने थैमान घातले आहे. कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनअभावी Oxygen अनेक कोरोनाग्रस्त नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले होते. या ऑक्सिजनचे महत्व समजण्यासाठी लोकांना कोरोना सारखी महामारी यावी लागली हे मात्र अत्यंत दुर्दैव म्हणावे लागेल.

कृत्रिमरीत्या मिळणाऱ्या ऑक्सिजनची किंमत आपण पाहिली आहे. मात्र विनामूल्य, अखंडपणे आपल्याला मिळत असणारा प्राणवायू हा किती मूल्यवान आहे, हे मात्र एव्हाना सर्वांना कळून चुकले आहे. देशभरात याच जाणीवेतून आता वृक्षारोपणाचे Plantation उपक्रम राबवले जात आहेत. हे एक सुचिन्ह मानावे लागेल.

कोब्रा बटालियनने उभारली ग्रीन आर्मी !
आर्मी जवानाच्या घरावर दरोडा,१० तोळे सोने लंपास !

भंडाऱ्यात केंद्रीय राखीव दलाच्या जवानांनी याच जाणीवेतून आणि पर्यावरणाचे महत्व समजावत मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले आहे. जसे देशाविरुद्ध विघातक काम करणाऱ्या शत्रुशी लढतो तसे कोरोना वायरस सारख्या शत्रुशी लढण्यास आपण सज्ज झालो असून पर्यावरण रक्षण करण्यासाठी ग्रीन आर्मी स्थापन करून तब्बल 10 हजार वृक्ष लागवड करण्याचे उद्धिष्ठ पूर्ण केल्याचे कोब्रा बटालियन कमांडर इन चीफ यांनी सांगितले आहे.

यावेळी देशाचे-समाजाचे सैनिक असल्याबरोबरच आम्ही पर्यावरणाचे देखील सैनिक असल्याचे त्यांनी सांगितले आहे. 5 जून पासून 206 कोब्रा बटालियन ने वृक्षारोपण करण्यास सुरुवात केली असून 28 जून पर्यत्न 10 हजार वृक्ष लागवड या बटालियनने केली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com