Malavan BJP Baba Mondkar News Saam Tv
महाराष्ट्र

Baba Mondkar : भाजपला मोठा धक्का! ऐन निवडणुकीत बड्या नेत्याचा तडकाफडकी पदाचा राजीनामा

Malavan BJP Baba Mondkar News : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला मोठा धक्का बसला असून मालवण तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर यांनी पदासह पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. जिल्हा नेतृत्वावर त्यांनी गंभीर आरोप केले आहेत.

Alisha Khedekar

  • भाजपचे मालवण तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर यांचा राजीनामा

  • २२ वर्षांच्या पक्षनिष्ठेनंतर घेतलेला निर्णय

  • जिल्हा नेतृत्वाच्या धोरणांवर गंभीर आरोप

  • निवडणुकीआधी भाजपमध्ये खळबळ

राज्यात एकीकडे महापालिकेच्या निवडणुकीची लगबग असताना दुसरीकडे मालवणमध्ये भाजपाला मोठा धक्का मिळाला आहे. मालवण तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर यांनी आज आपल्या पदाचा आणि पक्षाच्या सक्रिय सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. निवडणुकीपूर्वीच राजीनामा दिल्याने भाजपला याचा मोठा फटका बसणार आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. दरम्यान त्यांनी भाजपने कार्यकर्त्यांचा केवळ निवडणुकीपुरता वापर करून घेतला असल्याचा घणाघात केला आहे.

गेली २२ वर्षे भारतीय जनता पार्टीत एकनिष्ठपणे कार्यरत असणारे भाजपचे मालवण तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर यांनी आज आपल्या पदाचा आणि पक्षाच्या सक्रिय सदस्यत्वाचा राजीनामा दिला. जिल्हा नेतृत्वाच्या चुकीच्या धोरणांमुळे आणि अकार्यक्षमतेमुळे मालवण नगरपालिकेत भाजपचा पराभव झाला असून राणे समर्थक व जुन्या निष्ठावान भाजप कार्यकर्त्यांना डावलून दुसऱ्या पक्षातून आलेल्या पदाधिकाऱ्यांना उमेदवारी देऊन समांतर यंत्रणा राबविण्यात आली असा गंभीर आरोप मोंडकर यांनी पत्रकार परिषदेतून केला आहे.

नगरपरिषद निवडणुकीच्या वेळी जिल्हा नेतृत्वाकडून मित्रपक्षासोबत (शिवसेना-शिंदे गट) युती करण्याबाबत संभ्रम निर्माण केला. सुरुवातीला युती नाकारली आणि नंतर कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता स्वतंत्र लढण्याची रणनीती आखली, जी भाजपच्या पराभवास कारणीभूत ठरली. संघटनेत प्रश्न विचारणाऱ्या कार्यकर्त्यांना 'पटत नसेल तर राजीनामा द्या' असे उत्तरे जिल्हा स्तरावरून दिली गेली.

कार्यकर्त्यांचा केवळ निवडणुकीपुरता वापर करून घेतला असा आरोपही मोंडकर यांनी केला आहे. मोंडकर यांचा रोख हा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे निकटवर्तीय असलेल्या जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्याकडे असल्याच सांगितल जात आहे. बाबा मोंडकर यांनी तडकाफडकी दिलेल्या राजीनाम्यामुळे जिल्हा भाजपमध्ये खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पिंपरी चिंचवडमध्ये दुर्दैवी घटना! ट्रकच्या धडकेत दोन सख्या बहिणींचा मृत्यू

मतदानाआधी पैशांनी भरलेली बॅग आढळली, पाकीटं अन् ५०० च्या नोटाच नोटा! VIDEO

साफसफाई करताना अचानक मोठा स्फोट; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, २ गंभीर जखमी

विवाहितेची आत्महत्या की घातपात? कॉल रेकॉर्डिंगने उघडले गुपित, नेमकं काय घडलं?

Rajbhog sweet recipe: झटपट, पटापट...घरच्या घरी बनवा राजभोग मिठाई

SCROLL FOR NEXT