Devendra Fadnavis Saam Tv
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : लोकसभेचा निकाल काय लागणार? देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात सांगितलं

Devendra Fadnavis on Lok Sabha Result : देवेंद्र फडणवीस यांनी आगामी लोकसभा निकालावर मोठं वक्तव्य केलं आहे. लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होतील, असा दावा फडणवीसांनी केला आहे.

Vishal Gangurde

पराग ढोबळे, साम टीव्ही प्रतिनिधी

नागपूर : राज्यातील लोकसभा निवडणुकांचे टप्पे संपले आहेत. आता देशातील लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा बाकी आहे. राज्यातील लोकसभा निवडणुका झाल्यानंतर देशात कोणाची सत्ता येणार, यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. विरोधकांकडून देशात त्यांचंच सरकार येणार असा दावा करत आहे. आता या चर्चेत देवेंद्र फडणवीसांनी उडी घेतली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आगामी लोकसभेच्या निकालावर मोठं भाष्य केलं आहे. यंदाही लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होतील, असा दावा केला आहे.

देवेंद्र फडणवीस नागपूर विमानतळावर पोहोचले. नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त फडणवीस भेटीसाठी आले. यादरम्यान देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी ४ जूनला जाहीर होणाऱ्या लोकसभेच्या निकालावर मोठं भाष्य केलं आहे.

देवेंद्र फडणवीसांनी यावेळी पक्षातील कथित अंतर्गत वादाच्या आरोपावर भाष्य केलं. देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'आमची चर्चा सुरु आहे. तुम्हाला काही माहिती मिळते ते मिळू द्या. आमच्यात काही गडबड नाही'.

विधानसभेच्या जागावाटपावर करताना फडणवीस म्हणाले, 'विधानसभा फॉर्म्युला तिन्ही पक्षाचे बसवून ठरवतील. भाजप मोठा पक्ष आहे. आम्हाला इतर पक्षाचा सन्मान राखून जास्त जागा मिळतील'. तर पुणे पोर्शे कार अपघातावर कारवाईचे संकेत दिले आहेत. 'पुण्यात दुसरे ब्लड सॅम्पल दिले आहेत, पोलीस यात कारवाई करत आहे, असे त्यांनी सांगितलं.

संजय राऊत यांच्यावर टीका करताना फडणवीस म्हणाले, 'संजय राऊत यांच्याबाबत मला विचारू नका, ते गांजा पिऊन लेख लिहितात, ते लंडनला आहेत, तिथे चांगले मानसोपचार तज्ज्ञ आहेत'. तर आगामी लोकसभा निकालावरही फडणवीसांनी एका वाक्यात उत्तर दिले. 'मोदींना बहुमत मिळाले आहे, तेच पंतप्रधान होतील, असे फडणवीस म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunetra Pawar : 2029 मध्ये वहिनींनी मुख्यमंत्री व्हावं, जय पवार यांचं सुनेत्रा पवारांबद्दल मोठं विधान, VIDEO

मोठी बातमी! एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं; राजकीय वर्तुळात खळबळ|VIDEO

Dhule Tourism: लोणावळा-खंडाळा विसरा! धुळ्याजवळच्या 'या' थंड हवेच्या ठिकाणी नक्की फिरून या

Maharashtra News Live Update: सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

Benefits of Cinnamon Tea: वजन कमी करण्यासाठी रोज सकाळी उठल्यावर प्या ही खास चहा, मिळतील हे आरोग्यदायी फायदे

SCROLL FOR NEXT