Devendra Fadnavis
Devendra Fadnavis  Saam TV
महाराष्ट्र

Devendra Fadnavis Reaction: नोटबंदीच्या निर्णयाबाबत फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, "कुणी काळा पैसा..."

साम टिव्ही ब्युरो

Devendra Fadnavis Reaction: भारतीय रिझर्व्ह बँकेने दोन हजार रुपयांची नोट वितरणातून काढून टाकली. यानंतर त्यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. भाजपा समर्थक या निर्णयाचं कौतुक करत आहेत, तर विरोधक या निर्णयाने नोटबंधीचा निर्णय फसल्याचं सिद्ध झाल्याची टीका करत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ते नागपुरात बोलत होते (Breaking Marathi News)

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

"दोन हजार रुपयांची नोट ही सर्कुलेशन मधून बाहेर काढण्याचा निर्णय झाला आहे. त्याला काही आता इनलिगल ठरवलेलं नाही. ऑक्टोबरपर्यंत ही नोट सर्कुलेशनमधून बाहेर काढायची आहे. त्यामुळे ऑक्टोबरपर्यंत या नोटा बदला येतील", असं देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) म्हटलं आहे.

"ज्याच्याकडे कायदेशीर नोटा असतील, ज्यांच्याकडे पांढरा पैसा असेल. अशा कुणालाही चिंता करण्याची गरज नाही. कुणी काळा पैसा जर जमा करून ठेवला असेल, तर शेवटी त्यांना हे सांगावंच लागणार की त्याच्याकडे एवढा पैसा आला कुठून?", असंही फडणवीसांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, "दोन हजार रुपये आणि दुसऱ्या कोणताही नोटा बदल्यानंतर त्याचा सर्वात मोठा फायदा असा झाला की, जी फेक करन्सी आपल्याकडे पूश करण्याचा प्रयत्न, आयआयसारख्या संघटनाचा माध्यमातून होतो". (Latest Marathi News)

"तो प्रयत्न यामधून पूर्णपणे उधळला जातो. या निर्णयामुळे फेक करन्सी पूश करण्याचा प्रयत्न आहे, त्याच्यावर आळा येईल, दुसरीकडे ज्यांनी नोटा जमा करून ठेवल्या असतील, त्यांना हे सांगावं लागेल या नोटा कुठून आल्या म्हणून..", असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Custard Apple Benefits : डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी सीताफळ उपयुक्त; जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

Special Report : बारामतीत मडकं फोडणारा "तो" कार्यकर्ता कोण?

Special Report : तुम्हारे पास क्या है? कोल्हेंच्या डायलॉगबाजीने अहमदनगरात वातावरण तापलं

Mithila Palkar : ‘वेब क्वीन’ मिथिलाचा अनोखा साज, लूकने वेधले लक्ष

Nashik Lok Sabha: शांतीगिरी महाराज निवडणूक लढण्यावर ठाम, नाशिकमध्ये महायुतीला घाम! गोडसेंच्या अडचणी वाढणार?

SCROLL FOR NEXT