Devendra Fadnavis Attacked MVA SAAM TV
महाराष्ट्र

Devendra Fadnavis: महाराष्ट्रात फक्त एकच पॅटर्न चालतो, तो मोदींनी आणलाय; देवेंद्र फडणवीसांचा मविआवर हल्लाबोल

साम टिव्ही ब्युरो

Devendra Fadnavis: नांदेडमध्ये आयोजित सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकासआडीवर जोरदार हल्लाबोल केला. आता काही लोक एकत्रित येऊन भाजप-सेनेला पराभूत करू असे म्हणत आहेत. पण जंगालत कितीही प्राणी एकत्र आले तरी ते वाघाची शिकार करू शकत नाही, असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीस यांनी मविआवर केला आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, अमित शहा यांची नांदेडमध्ये सभा घेतली तर अशोक चव्हाण म्हणाले, भाजपाला शंका आहे नांदेड मध्ये लोकसभा जिंकतील. अशोक राव तुमची मजल टूजी, थ्रीजी आणि सोनियाजीपर्यंत आहे. काँग्रेसला थोडं यश मिळालं तरी त्यांच्या डोक्यात हवा जाते. महाराष्ट्रात कर्नाटक पॅटर्न आणणार म्हटले असे चव्हाण म्हणाले, मात्र मी त्यांना सांगतो महाराष्ट्रात फक्त छत्रपती शिवाजी राजे पॅटर्न चालतो आणि हा पॅटर्न मोदीजींनी आणला आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, 2014 आणि 2019 प्रत्येक निवडणुकीत शरद पवार एकच सांगतात मोदी लाट ओसरली मोदी लाट ओसरली आणि रेकॉर्ड ब्रेक मतांनी मोदीजी निवडून येतात. काल हा देश मोदीजींच्या मागे होता, आजही आहे आणि उद्याही असेल. आमची स्पर्धा ही गुजरातसोबत आहे? कोण जास्त खासदार निवडून देतोय यासाठी आम्ही स्पर्धा करतोय. (Breaking News)

महाराष्ट्रात २५ लाख लोकांना मोदीजी यांनी घर दिलं. मोफत कोविडची लस देण्याचं काम मोदीजी यांनी केलंय. ७० वर्षांत पाणी पोहोचलं नव्हतं तिथे मोदी जी यांनी १ कोटी १२ लाख लोकांच्या घरी पाणी पोहोचवले. मोदींच्या नेतृत्त्वा 4 लाख कोटींची प्रकल्प आलेत, रस्ते होत आहेत पुल होत आहेत. मोदींच्या सरकराने पायाभूत सुविधांसाठी 4 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यामुळे 9 वर्षात राज्यातल्या गरिबाला, मध्यमवर्गीयांना सामान्य मराठी मानसाला मोदींच्यांच्या नेतृत्त्वात विकास अनुभवायला मिळाला, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. (Latest Political News)

फडणवीस म्हणाले, तुमच्या आशिर्वादाने पुन्हा एकदा डबल इंजिनचं सरकार आलं. आधी देखील 2014 ते 19 सरकार तुम्ही पाहिलं. महाराष्ट्र बदलण्याचं काम आपण केलं. समृद्धीसारखा महामार्ग आपण तयार केला. मध्यंतरी अडीच वर्षाचं सरकार होतं. आता काही लोक एकत्रित येऊन भाजप सेनेला पराभूत करू असे म्हणत आहेत. पण जंगालत कितीही प्राणी एकत्र आले तरी ते वाघाची शिकार करू शकत नाही, असे म्हणत फडणवीस यांनी महाविकास आघाडीला आवाहन दिले आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : आज 'या' 5 राशींवर होणार गणरायाची कृपा, मिळणार गोड बातमी

Kalyan Crime : धक्कादायक! दिव्यांग दाम्पत्याच्या बाळाला विकण्याचा प्रकार; डॉक्टरचं कृत्य उघडकीस, कल्याणमधील खळबळजनक घटना

Manoj Jarange Patil: 'आरक्षण न दिल्यास फडणवीस जबाबदार' विधानसभा तोंडावर जरांगेंचा सहाव्यांदा उपोषणाचा एल्गार

Fact Check : डीजेमुळे फाटल्या व्यक्तीच्या मेंदूच्या नसा? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics: मुख्यमंत्र्यांचं ठरलं, स्ट्राईकरेटवर अडलं? शिंदेंचा फॉर्म्युला भाजप, अजित पवार गट स्वीकारणार? वाचा...

SCROLL FOR NEXT