देवेंद्र फडणवीस - Saam TV
महाराष्ट्र

अशोकराव, तुम्ही मध्यस्थी करा; बुलेट ट्रेनचं काम पूर्ण करा- फडणवीसांची विनंती

महाराष्ट्र सरकारने बंद केलेल्या बुलेट ट्रेनची कामे सुरू केली तर इतर बुलेट ट्रेनचा मार्ग मोकळा होणार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नांदेड : महाराष्ट्र सरकारने बंद केलेल्या बुलेट ट्रेनची कामे सुरू केली तर इतर बुलेट ट्रेनचा मार्ग मोकळा होणार आहे, आणि यामुळे मराठवाड्यातील बुलेट ट्रेनचे स्वप्न साकार होणार आहे. याकरिता राज्याचे जबाबदार मंत्री असलेले अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी मध्यस्थी करून मुख्यमंत्र्यांना विनंती करावी, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी करत ठाकरे सरकारला (government) यावेळी टोला लगावला आहे.

हे देखील पहा-

ते नांदेडमध्ये बोलत होते. रेल्वे प्रकल्पाकरता ५०% निधी हा राज्याने द्यायचा असतो. तो राज्याने देणे बंद केल्याने, सगळे रेल्वे प्रकल्प बंद पाडण्यात आले आहेत. तो देखील निधी राज्याने देणे सुरू केले, तर राज्यातील सगळे प्रकल्प मार्गी लागणार आहेत, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. दरम्यान काल यवतमाळमध्ये देवेंद् फडणवीस यांनी राज ठाकरेंच्या भाषणावर प्रतिक्रिया दिली आहे, ते म्हणाले आहे की, राज ठाकरे यांचं म्हणणे खरे आहे.

क्रमांक एकचा भाजप पक्ष सत्तेच्या बाहेर बघायला मिळत आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना हे ३ पक्ष एकत्र येऊन सरकार चालवत आहे, अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. यवतमाळ येथे काल आमदार मदन येरावार यांच्याकडे आले असता देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांसमोर मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांच्या भाषणावर भाष्य केले आहे. परंतु, राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण न ऐकल्याने जास्त बोलणं योग्य नाही, असे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले आहेत.

मुंबईतील शिवाजी पार्कवर गुढीपाडवा मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधारी महाविकास आघाडीवर जोरदार टीका करण्यात आली आहे. महाराष्ट्रात १ नंबरचा पक्ष भारतीय जनता पक्ष, २ नंबरचा पक्ष शिवसेना आणि ३ नंबरचा पक्ष राष्ट्रवादी, असे असताना ३ नंबरचा पक्ष १ आणि २ नंबरच्या पक्षाला फिरवत आहे. मी महाराष्ट्राच्या राजकारांबरोबर देशाच्या राजकारणात असा प्रकार पाहिला नाही, असा हल्लाबोल राज ठाकरे यांनी यावेळी केला आहे. आज महाविकास आघाडी सरकारवर केला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आरोप करून पळ काढू नका; अजित पवारांबाबत निर्णायक भूमिका घ्या, नाहीतर माफी मागा, उद्धव ठाकरेंचा घणाघात|VIDEO

दुबार मतदार आढळला तर जागेवर फोडून काढा, मनसे- शिवसैनिकांना राज ठाकरेंचा आदेश|VIDEO

Raj Thackeray: शिवाजीपार्कमधील सभेत राज ठाकरेंनी का व्यक्त केली दिलगीरी, नेमकं काय घडलं?

एमआयएम-काँग्रेस युती, ड्रग्स ते बदलापूर बलात्कार प्रकरणाचा आरोपी नगरसेवक, राज ठाकरेंनी भाजपचे कपडेच फाडले|VIDEO

Raj Thackeray: राज ठाकरेंनी अदानींचा दाखवला 'तो' व्हिडिओ; Video पाहताच अख्खा महाराष्ट्र हादरला

SCROLL FOR NEXT