Fadnavis Modi Defended Ajit Pawar Saam
महाराष्ट्र

'अजित पवारांचं पाप देवेंद्र फडणवीसांनी लपवलं, मोदींकडून पाठिंबा' विजय पांढरेंचा खळबळजनक आरोप

Fadnavis Modi Defended Ajit Pawar: विजय पांढरे यांनी अजित पवारांना सिंचन घोटाळ्याचे सूत्रधार ठरवले. फडणवीस आणि मोदी यांनी पवारांचे पाप झाकले, असा आरोप.

Bhagyashree Kamble

  • विजय पांढरे यांनी अजित पवारांना सिंचन घोटाळ्याचे सूत्रधार ठरवले.

  • फडणवीस आणि मोदी यांनी पवारांचे पाप झाकले, असा आरोप.

  • माधवराव चितळे समितीचा अहवाल असूनही कारवाई टाळली गेली.

  • कारवाई झाली तर अजित पवार दोन दिवसांत जेलमध्ये जातील, असा दावा.

राज्यातील बहुचर्चित सिंचन घोटाळाबाबत आता नवा वाद उफाळून आला आहे. या प्रकरणावरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आरोप आणि टीका होत असताना यात विजय पांढरे यांनी उडी घेतली. पांढरे यांनी अजित पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत त्यांनी,'अजित पवारांचं सिंचन घोटाळ्याचं पाप देवेंद्र फडणवीसांनी लपवलं', असा थेट आरोप त्यांनी केला आहे. पांढरे यांनी केलेल्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

पांढरे यांनी व्हिडिओत म्हटलं की, 'अजित पवार हे राज्यातील सिंचन घोटाळ्याचे खरे सूत्रधार होते. त्यावेळी उच्चस्तरीय चौकशी नेमून त्यांच्यावर कारवाई केली असती, तर अजित पवार हे तुरुंगात गेले असते', असं पांढरे म्हणाले. 'मात्र,देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांचं जलसिंचन घोटाळ्याचं पाप लपवलं. या गोष्टीला पंतप्रधान मोदी यांनी पाठिंबा दिला आहे', असा आरोप विजय पांढरे यांनी केला.

विजय पांढरे हे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारच्या काळात जलसंपदा विभागाचे तत्कालीन मुख्य अभियंता होते. पांढरे यांनी नुकतंच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत, अजित पवार यांच्याविरोधातील जलसंपदा घोटाळ्याच्या आरोपांचा पुनरुच्चार केला. काल ८ संप्टेंबर रोजी त्यांनी समाज माध्यमांवर व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओद्वारे त्यांनी थेट आरोप केले.

त्यांनी सांगितले की, 'जलसिंचन घोटाळ्याच्या चौकशीसाठी माधवराव चितळे समिती नेमण्यात आली होती. पण चितळेंनी अहवालात खरी परिस्थिती मांडली नाही. परिणामी सरकारला अजित पवारांवर कारवाई टाळण्याची संधी मिळाली', असं पांढरे म्हणाले.

विजय पांढरे यांनी असाही दावा केला की, 'लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अजित पवारांना क्लीनचिट दिल्याचं लेखी स्वरूपात नागपूर खंडपीठात सादर केलं होतं. मात्र, अद्याप खंडपीठानं ती क्लिनचीट मान्य केलेली नाही. त्यामुळे सुनावणी प्रलंबित राहिली. ही अडचण आहे', असं पांढरे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: हफ्ता बंद झाल्याने लाडक्या बहिणी रस्त्यावर, फडणवीस सरकारविरोधात आक्रमक

Kabul Blast: अफगानिस्तान हादरलं! राजधानीमधील हॉटेलमध्ये मोठा स्फोट, अनेक लोकांचा मृत्यू

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणीचा हफ्ता आला नाही? मग या गोष्टी लगेचच तपासा

Navneet Rana: 'बाबा सिद्दिकीसारखी तुझी हत्या करू', भाजप नेत्या नवनीत राणा यांना पुन्हा धमकी

Maharashtra Live News Update: आंबेगाव तालुक्यात राष्ट्रवादीला झटका, राष्ट्रवादीचा बडा नेता शिंदेंच्या शिवसेनेत

SCROLL FOR NEXT