Maharashtra Government Formation : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? चार दिवसांपासून महायुतीला या प्रश्नाचं उत्तर अद्याप मिळालेलं नाही. एकनाथ शिंदे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. एकनाथ शिंदेंनी दावा सोडल्यामुळे भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा झाला. पण मुख्यमंत्री कोण होणार? हे अद्याप ठरलेलं नाही. देवेंद्र फडणवीस पुन्हा येणार? की भाजप धक्कातंत्र वापरणार? याची उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. (Maharashtra CM News Devendra Fadnavis and amit shah)
आज अजित पवार, एकनाथ शिंदे आणि भाजपाच्या सर्वोच्च नेत्यांची दिल्लीत बैठक होणार आहे. या बैठकीनंतर महाराष्ट्राची काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या पक्षाच्या सर्व खासदारांना दिल्लीत भेटणार आहेत. दिल्लीमध्ये अधिवेशन सुरू असल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे सर्व खासदार आज दिल्लीत आहेत. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या सर्व खासदारांना आज दिल्लीत उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. आज अजित पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस अमित शाह यांची भेट घेणार आहे. या बैठकीत मंत्रिपदावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? हे २४ तासांच्या आत स्पष्ट होण्याची शक्यता आहे. भाजप आणि राष्ट्रवादीच्या १७८ आमदारांचे देवेंद्र फडणवीस यांना पाठबळ आहेच. पण भाजप धक्कातंत्रामध्ये तरबेज आहे. राजस्थान आणि हरियाणामध्ये भाजपने मुख्यमंत्रीपदासाठी नवख्या चेहऱ्यांना संधी दिली होती. आता महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात भाजप सत्तेची चावी कुणाच्या हाती देणार? याची चर्चा सुरु झाली आहे. मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव सर्वात आघाडीवर आहे. मुख्यमंत्रिपदाबाबत आज अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. २४ तासांत महाराष्ट्राचा बॉस कोण होणार? यावरुन पडदा उठणार आहे.
महाराष्ट्रातील नेत्यांसोबत होणाऱ्या बैठकीच्या आधी अमित शाह यांनी विनोद तावडे यांना भेटीसाठी बोलवालं होतं. दोन्ही नेत्यांमध्ये दीर्घ चर्चा झाल्याचे समजतेय.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासंदर्भात विनोद तावडे आणि अमित शाह यांच्यात चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. राज्यातील परिस्थिती पाहता मुख्यमंत्री कोण असावा यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. त्याशिवाय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींविषयी देखील भेटीत चर्चा झाली.
भाजपकडून मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्यास वेगळा इतिहासच होणार आहे. कारण महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात आतापर्यंत उपमुख्यमंत्री राहिलेला व्यक्ती मुख्यमंत्री झालेला नाही. देवेंद्र फडणवीस २०१४ ते २०१९ या काळात मुख्यमंत्री होते. त्यानंतर महायुतीच्या काळात २०२२ ते २०२४ या काळात देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. आता जर त्यांची मुख्यमंत्री म्हणून निवड झाली, तर हे ऐतिहासिकच असेल. कारण, महाराष्ट्राच्या इतिहासात आतापर्यंत एकही नेता उपमुख्यमंत्रिपद भूषावल्यानंतर मुख्यमंत्री झाला नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.