Devendra Fadnavis Banner
Devendra Fadnavis Banner  Saam Tv
महाराष्ट्र

फडणवीसांच्या फलकावरून शहांचा फोटो गायब; बॅनर लावणाऱ्या माजी महापौरांनीच सांगितलं कारण

मंगेश मोहिते

नागपूर : राज्यात सत्तासंघर्षानंतर बंडखोर नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले आहेत. तर राज्यातील सत्तेत सहभागी न होता बाहेर राहणार असे जाहीर करणारे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावं लागलं आहे. मुख्यमंत्रीपदाचा अनुभव असणाऱ्या देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशामुळे उपमुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावं लागणार आहे. मात्र, सत्तेतील दुसऱ्या क्रमांकाच्या पदामुळे देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या समर्थक भाजप कार्यकर्त्यांमध्ये उघड नाराजी दिसत आहे. या भाजपच्या नाराजीवर नागपूरचे (Nagpur) माजी महापौर संदीप जोशी यांनी उघड भाष्य केलं आहे. ( Devendra Fadnavis News In Marathi )

राज्यातील नाट्यमय घडामोडींनंतर देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद मिळेल अशी चर्चा होती, परंतु मुख्यमंत्रीपदाची माळ ही एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात पडली. खरंतर शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची लॉटरी लागली. मात्र, मुख्यमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांना न मिळाल्याने राज्यातील भाजप नेत्यांमध्ये असलेली नाराजी उघड झाली आहे. त्यात भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस आहे का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. तर नागपुरातील देवेंद्र फडणवीस यांच्या होर्डिंगवरून केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे जेष्ठ नेते अमित शाह यांचे फोटो गायब झाले आहेत. नागपुरात फडणवीसांचे होर्डिंग लावणारे भाजपचे माजी महापौर आणि देवेंद्र फडणवीस यांचे मित्र संदीप जोशी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संदीप जोशी म्हणाले, होर्डिंगवरील नेत्यांची फोटो हे प्रोटोकॉलनुसारच असून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं आम्हाला नक्कीच वाटत होतं. मात्र, मुख्यमंत्रीपदाची माळ ५० आमदार असणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात घातली. त्यानंतर देवंद्र फडणवीस हे स्वत:उपमुख्यमंत्री झाले याचं आम्हाला दु:ख झाले आहे. या दु:खातून आम्ही नागपूर शहरभर अशा प्रकारचे बोर्डिंग लावले आहेत'. अमित शाह यांचा फोटो होर्डिंगमधून गायब झाल्याने भाजप नेत्यांमध्ये नाराजी उघड असल्याचे दिसून येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षीय मुलगा ठार, जुन्नर तालुक्यातील घटना

Bhandara News: धावत्या बसमध्ये प्रवाशानं सोडला जीव; भोवळ आल्यावरच बस हॉस्पिटलला नेण्याची केली विनंती, पण कंडक्टर अडून बसला

Maharashtra Politics : काँग्रेस मजबूत, तर देश मजबूत होईल; शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया

Nashik Crime News : गुन्हेगार मित्रांची संगत नडली, नाशिकमध्ये ६ जणांसह ८७ गुंड तडीपार

Hingoli Water Crisis : पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बनला गंभीर; हिंगोलीच्या सिद्धेश्वर धरणात पाण्याचा मृतसाठा

SCROLL FOR NEXT