Nashik Crime News : गुन्हेगार मित्रांची संगत नडली, नाशिकमध्ये ६ जणांसह ८७ गुंड तडीपार

Nashik Breaking News: नाशिक पोलिसांनी तब्बल ८७ गुंडांवर तडीपारीची कारवाई केली आहे. विशेष बाब म्हणजे, सराईत गुन्हेगारांच्या ६ मित्रांना देखील तडीपार करण्यात आले आहे.
Nashik Breaking News
Nashik Breaking NewsSaam TV

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी तब्बल ८७ गुंडांवर तडीपारीची कारवाई केली आहे. विशेष बाब म्हणजे, सराईत गुन्हेगारांच्या ६ मित्रांना देखील तडीपार करण्यात आले आहे. पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.

Nashik Breaking News
Nashik News : धक्कादायक.. मुलांना विष देऊन विवाहितेची इमारतीवरून उडी; पती व सासरच्या त्रासाला कंटाळून उचलले पाऊल

नाशिक पोलिसांच्या या कारवाईमुळे गुन्हेगारी विश्वास मोठी खळबळ उडाली असून गुन्हेगारांशी जवळीक ठेवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. तडीपार करण्यात आलेल्या गुंडांमध्ये जय पंजाब मोहिते, उमेश सुरेश वाघ, प्रशांत उर्फ स्वप्निल तुकाराम डंबाळे, फिरोज सलीम शेख, रोहित गोटीराम बोराडे, जयशंकरसिंग देवेंद्रसिंग राजपूत यांचा समावेश आहे.

नाशिक आयुक्तालयातील परिमंडळ एक अंतर्गत ५२ सराईत गुन्हेगार आणि परिमंडळ २ मधील तब्बल ३५ गुन्हेगार एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहेत. मागील काही दिवसांपासून शहरात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे. ठिकठिकाणी गोळीबार तसेच खूनाच्या घटना घडत आहेत.

हीच बाब लक्षात घेता पोलिसांनी शहरातील ५२ गुंडांना तडीपार केलं आहे. दरम्यान, जानेवारी महिन्यात म्हसरुळ परिसरात एका निवृत्त जवानाची गुंडाने हत्या केली होती. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली होती. अटक करण्यात आलेले तीनही गुन्हेगार अद्याप कारागृहात आहेत.

या घटनेपूर्वी गुन्हेगारांचे ६ मित्र त्यांच्याबरोबर एकत्र दारू पिण्यास बसले होते. त्यांच्यावर गुन्हा दाखल नसतानाही पोलिसांनी तडीपार केलं आहे. दरम्यान, सराईत गुन्हेगारांसोबत मैत्री ठेवणाऱ्यांसोबत असेच धोरण अवलंबिले जाणार, असा इशारा पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी दिला आहे.

Nashik Breaking News
Buldhana Accident News: धक्कादायक! अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रकने २ पादचारी महिलांना चिरडलं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com