Devendra Fadnavis On Chandrakant  Patil
Devendra Fadnavis On Chandrakant PatilSaam TV

फडणवीस मुख्यमंत्री होऊ शकत होते, पण...; चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्यामागील कारण

'एकनाथ शिंदे यांनी अस्वस्थ असलेल्या आमदारांना बाहेर काढले. तेव्हा आम्ही म्हणालो ही आमची भूमिका नाही.'
Published on

सुशांत सावंत -

मुंबई : काल राज्याच्या मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यामुळे अनेक राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. शिवाय या पदामुळे फडणवीस (Devendra Fadnavis) नाराज असल्याचं देखील बोललं जात होतं. या सर्व घडामोडींवरती चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी वक्तव्य केलं आहे.

आज पत्रकारांशी बोलताना पाटील म्हणाले, ' एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अस्वस्थ असलेल्या आमदारांना बाहेर काढले. तेव्हा आम्ही म्हणालो ही आमची भूमिका नाही. या अस्वस्थतेमुळे हे सरकार पडले. आम्ही आधीच म्हणालो हे अंतर्गत कलहाने सरकार पडेल. त्यागामध्ये आनंद व्यक्त करणे हे हिंदुत्व आहे. फडणवीस मुख्यमंत्री होऊ शकत होते पण हिंदुत्वासाठी आनंद दिघे यांचे शिष्य एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले. प्रशासनाची आवश्यकता असल्याने एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांना आग्रह केला होता.

त्यानंतर पक्षश्रेष्ठींशी बोलले आम्ही निर्णय पक्ष श्रेष्ठीना विचारतो. यासाठी मन मोठे लागते देवेंद्र फडणवीस यांनी मोठे मन दाखवले. हिंदूंना आनंद देणारे सरकार आले आहे. अमित शहांमध्ये आणि आमच्यात सलोख्याची नाती आहेत. मत्सर वाटतो अशा लोकांनी केलेल्या या स्टोऱ्या आहेत.

पाहा व्हिडीओ -

तसंच हिंदुत्ववादाच्या प्रेरणेतून आमच्या पार्टीची निर्मिती झाली. हिंदुत्वाच्या आधारे कार्यक्षेत्राची रचना लावण्यासाठी भाजपची स्थापना झाली. हिंदुत्वासाठी संघर्ष, हिंदुत्वासाठी प्रयत्न केला गेला. ३७० कमल, काश्मिर भारतात राहिला पाहिजे येथून आमच्या कामाला सुरुवात झाली. हिंदुत्व हा आमचा श्वास आहे हे आम्ही दाखवत आहोत.

हिंदुत्ववादी विचार मान्य असलेल्या अनेकांनी भाजपसोबत युती केली. २०१९ ला युती केली पण नंतर घात केला. ज्यांच्यावर बाळासाहेब ठाकरे यांनी आसूड ओढले त्यांच्या मांडीला मांडी लावून शिवसेना बसली. आमचा विरोध विकास आणि हिंदुत्वासाठी होता. राम मंदिरासाठी निधी दिला त्याची टिंगल केली. तुमचे आयुष्य वर्गणी जमा करण्यात केले पण राम मंदिर निधीवर टिंगल केली अशी टीका पाटील यांनी शिवसेनेवर केली.

Devendra Fadnavis On Chandrakant  Patil
मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार घेताच एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये

तसंच, आजान स्पर्धा झाली. बाळासाहेबांना जनाब म्हटलं गेलं यांनी मुंबईकरांची वाट लावली. मेट्रोचं काय झालं, बुलेट ट्रेनचं काय झालं माहीत नाही. पूर आला तेव्हा अजित पवार म्हणाले आम्ही नद्यांवर भिंत बांधणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिरडून टाकले. ओबीसी आरक्षण या सरकारने घालवले, मराठा आरक्षण घालवले धनगर आरक्षणासाठीही यांनी काही केलं नाही असा घणाघात त्यांनी ठाकरे सरकारवर केला.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com