नागपुरातील तरुणाचा देशी जुगाड; भंगारातून बनविली रेसिंग कार! पहा Video  SaamTVNews
महाराष्ट्र

नागपुरातील तरुणाचा देशी जुगाड; भंगारातून बनविली रेसिंग कार! पहा Video

नागपुरातील एका तरुणानं देशी जुगाड करत चक्क रेसिंग कार तयार केलीय. विशेष म्हणजे त्यानं भंगारातील वस्तूंमधून साधीसुधी नाही तर फार्मूला वन कार बनवलीय.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपूर : नागपुरातील एका तरुणानं देशी जुगाड करत चक्क रेसिंग कार तयार केलीय. विशेष म्हणजे त्यानं भंगारातील वस्तूंमधून साधीसुधी नाही तर फार्मूला वन कार (Car) बनविलीय. या ध्येयवेड्या तरुणाचं नाव आहे स्वप्नील चोपकर असं आहे. विशेष म्हणजे 26 जानेवारी ला त्यानं या कारची यशस्वी ट्रायल घेतलीय. या त्याच्या रेसिंग कारची सध्या नागपूरात (Nagpur) सर्वत्र चर्चा आहे. Desi jugaad of youth in Nagpur; Racing car made from scrap!

स्वप्नील चोपकर (Swapnil Chopkar) या ध्येयवेड्या तरुणाने भंगारातील सामानातून ही कार तयार केलीय. विशेष म्हणजे ही कार साधीसुधी नसून चक्क फॉर्म्युला वन रेसमध्ये धावणारी स्पोर्ट कार आहे. 26 वर्षीय स्वप्नील नागपुरातील रामेश्वरीच्या पार्वती नगर येथे राहतो. काही वर्षांपूर्वी स्वप्नीलने स्वतःच्या कामाईनं एक तरी कार विकत घेण्याचा स्वप्न बघितलं होतं. मात्र, परिस्थितीमुळे ते शक्य होऊ शकले नाही. त्यामुळं त्यानं भंगारातून कार आणि दुचाकीचे पार्ट्स विकत आणून चक्क फॉर्म्युला वन रेसिंग कार तयार केली.

स्वप्नील हा ऑटोमोबाईल क्षेत्रात काम करत असताना त्याला स्वतःची कार तयार करण्याची कल्पना सुचली. नोकरी करताना जमवलेल्या पैशातून त्याने भंगाराच्या दुकानातुन कारचे इंजिन, शॉकअप, चाक, सायलेन्सर अशा अनेक वस्तू गोळा करण्यात सुरुवात केली. कार तयार करण्याचा कोणताही अनुभव नसल्यानं स्वप्नील अनेक वेळा चुकला. मात्र, मार्गदर्शकांनी केलेल्या सूचनांचे पालन करून त्यानं अखेर कार तयार करून दाखवली. फॉर्म्युला वन रेसिंग कार तयार करण्यासाठी स्वप्नीलला एक लाख ते सव्वा लाखांचा खर्च आला आहे. स्वप्नीलने तयार केलेली फॉर्म्युला वन रेसिंग कारमध्ये 800 सीसीचे इंजिन बसवण्यात आले आहे. ती 19चा मायलेज देत आहे. तर सध्या ही कार 140 किलोमीटर प्रतितास धावू शकते, असा दावा त्याने केलाय.

स्वप्नील जेव्हा ही कार बनवीत होता त्यावेळी त्याच्या घरच्यांना विश्वास नव्हता. तासनतास स्वप्नील काम करायचा त्यावेळी घरच्यांची चिडचिड व्हायची. मात्र, त्याच्या आईचा त्याला सपोर्ट होता. कार तयार झाल्यावर आईने आपल्या मुलाचा अभिमान असल्याचं सांगितलं. भविष्यात यामध्ये आणखी संशोधन करून स्पीड आणि मायलेज वाढवण्यासाठी स्वप्नील प्रयत्न करणार आहे. आरटीओ कार्यालयात नोंदणी करून परवाना मिळविणार आहे. या देशी जुगाड ला भविण्यात कसा प्रतिसाद मिळतो, हे बघावं लागणार आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips: धावपळीच्या जीवनात मन शांत आणि स्थिर ठेवायचे? फॉलो करा 'या' टिप्स

Tata Punch: फक्त 1 लाखात घरी आणा टाटाची दमदार कार; लोनवर किती भरावे लागेल EMI

Suryakumar Yadav: विराटची रिप्लेसमेंट मिळाली...दक्षिण आफ्रिकेला धूळ चारल्यानंतर सूर्या काय म्हणाला?

Maharashtra News Live Updates: बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी आणखी एकाला अटक

Sharad Pawar News : भर सभेत शरद पवारांना मिळाली चिठ्ठी! पुढे जे झालं ते, पाहा Video

SCROLL FOR NEXT