Maharashtra Political News
Maharashtra Political News Saam Tv
महाराष्ट्र

Narhari Zirwal News: नॉट रिचेबल नरहरी झिरवळ पुन्हा रिचेबल, म्हणाले...

Shivani Tichkule

तबरेज शेख

Narhari Zirwal News: महाराष्ट्राच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. कारण, आज सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील निकाल देणार आहे. त्यामुळे न्यायालय काय निर्णय देणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (Latest Marathi News)

सत्तासंघर्षाच्या निकालावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांकडून विविध तर्क-वितर्क लावले जात असताना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) नॉट रीचेबल झाल्याची चर्चा सुरु होती. झिरवळ यांचे दोन्ही फोन बंद होते. मात्र आता नरहरी झिरवळ पुन्हा रिचेबल झाले असून त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

'मी जो निर्णय घेतला आहे तो कायद्याला धरून घेतलेला आहे. त्यानंतरच 16 आमदारांना अपात्र केलेला आहे. आजचा निकाल योग्य लागेल हे सगळे आमदार अपात्र होतील. जर १६ आमदारांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आहेत. ते अपात्र झाल्यानंतर आपोआप मुख्यमंत्रीपद जाईल. त्यानंतर सरकार कोसळेल, तर घटना कुणाच्या दबावाखाली बदलत नाही. त्यामुळे आज त्यांचे आमदार अपात्र होतील. सुप्रीम कोर्ट कायदा तपासूनच निर्णय घेईल असा मला विश्वास, असंही झिरवळांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

शिंदे गटातील 16 आमदार कोण?

  1. एकनाथ शिंदे

  2. अब्दुल सत्तार

  3. तानाजी सावंत

  4. यामिनी जाधव

  5. संदिपान भुमरे

  6. भरत गोगावले

  7. संजय शिरसाट

  8. लता सोनवणे

  9. प्रकाश सुर्वे

  10. बालाजी किणीकर

  11. बालाजी कल्याणकर

  12. अनिल बाबर

  13. संजय रायमुलकर

  14. रमेश बोरणारे

  15. चिमणराव पाटील

  16. महेश शिंदे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Johnny Lever: कोण आहे आमिर खान? मुलाखतीदरम्यान जॉनी लीव्हर काय म्हणाला? VIDEO

KKR vs DC: इडन गार्डनवर दिल्लीचं 'पानीपत'; IPLमधील कोलकाताचा ६वा विजय

Maharashtra Election:'..त्यांचा सत्यानाश होणार'; अकलूजमधून फडणवीसांचा मोहिते-पाटलांना इशारा

3.99 लाख रुपये किंमत, 25km मायलेज; सीएनजी आणि इलेक्ट्रिकपेक्षा बहजत 'या' कारला आहे मागणी

Maharashtra Election: नाशकातून शिंदे गटाने तिकीट दिल्याचा दावा; कोण आहेत शांतीगिरी महाराज?

SCROLL FOR NEXT