Deputy Chief Minister Sunetra Pawar meeting the family of Videep Jadhav, who died in a plane crash. saam tv
महाराष्ट्र

Sunetra Pawar: विदीप जाधव यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतला पहिला मोठा निर्णय

Deputy CM Sunetra Pawar: विमान अपघातात अजित पवार यांच्यासह त्यांचे अंगरक्षक विदीप जाधव यांचाही मृत्यू झाला. आज राज्याच्या नव्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी जाधव यांच्या कुटुबियांची भेट घेतलीय.

Bharat Jadhav

  • विमान अपघातात अजित पवार यांच्यासह विदीप जाधव यांचा मृत्यू झाला.

  • उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी जाधव कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.

  • भेटीनंतर कुटुंबीयांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला.

अजित पवार यांचे अंगरक्षक विदीप जाधव यांच्या कुटुंबियांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी भेट घेतली. बारामती येथे विमान अपघातामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांसह अंगरक्षक विदीप जाधव यांचाही मृत्यू झाला. जाधव कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कर्तव्यनिष्ठ पोलीस म्हणून ओळख असलेल्या विदीप जाधव यांच्या जाण्याने केवळ एक अधिकारीच नाही तर एका कुटुंबाचा आधार हरपलाय. जाधव कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मोठा निर्णय घेतलाय.

अपघातानंतर जाधव कुटुंबियांची अवस्था अत्यंत बिकट झालीय.घरातील कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबासमोर अनेक प्रश्न उभे राहिलेत. विदीप जाधव यांच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुले तसेच आई-वडील असा परिवार आहे. सर्वांच्या जबाबदाऱ्या विदीप जाधव यांच्या पत्नीवर आल्या आहेत. त्यांच्या भविष्याबाबत त्यांची चिंता वाढली आहे.

विदीप जाधव यांच्या पत्नीला योग्य नोकरी मिळावी, जेणेकरून कुटुंबाला कायमस्वरूपी आधार मिळेल अशी जाधव कुटुंबियांनी केलीय. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी त्यांची मागणी ऐकली आणि मान्यही केली केली आहे. आमदार रोहित पवार यांनीही जाधव कुटुंबियांची भेट घेतली होती.

विदीप जाधव यांनी वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पोलीस सेवेत दाखल झाले होते. प्रामाणिकपणे कर्तव्य बजावत असताना त्यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यामुळे संपूर्ण जाधव कुटुंबाचे आयुष्य बदलून गेले. घरखर्च, मुलांचे संगोपन आणि शिक्षण यांचा मोठा भार आता कुटुंबावर पडलाय. या कठीण काळात आमदार रोहित पवार यांनी विदीप जाधव यांच्या मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलण्याची ग्वाही दिलीय. तर आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विदीप जाधव यांच्या पत्नीला नोकरी देण्याची मागणी मान्य केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kangana Ranaut-Aishwarya Rai : "ती तुम्हाला खुश करण्यासाठी इथे आलेली नाही..."; ऐश्वर्याला ट्रोल करणाऱ्यांना कंगना रणौत यांचं सडेतोड उत्तर

एकीकडे 47°C उष्णतेचा तडाखा, दुसरीकडे मुसळधार पाऊस; महाराष्ट्रात हवामानाची दोन टोकं|VIDEO

Maharashtra News Live Update: मुंबई आग्रा महामार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघात , सहा जणांचा मृत्यू

आंबा खाल्ल्यानंतर पोट बिघडतं? मग 'या' चुका टाळाच, वाचा तज्ञांचा सल्ला...

Pune : एसटी बसने दुचाकीला चिरडले, ४ जणांचा जागीच मृत्यू, पुण्यात भयंकर अपघात

SCROLL FOR NEXT