Ajit Pawar on Ladki Sunbai Yojana Saam Tv
महाराष्ट्र

लाडक्या बहिणीनंतर एकनाथ शिंदे लाडकी सुनबाई योजनेची घोषणा करणार का? अजितदादा म्हणाले...

Ladki Sunbai Yojana: लाडकी बहीण योजना महायुती सरकारची लोकप्रिय योजना ठरली. आता लाडकी सुनबाई योजना सुरू करण्याच्या चर्चेला उधाण आलं आहे. अजित पवार यांनी स्पष्ट केलं की याबाबत अजून कोणताही कॅबिनेट निर्णय झालेला नाही.

Bhagyashree Kamble

  • लाडकी बहीण योजना महायुती सरकारची लोकप्रिय योजना ठरली.

  • आता लाडकी सुनबाई योजना सुरू करण्याच्या चर्चेला उधाण आलं आहे.

  • अजित पवार यांनी स्पष्ट केलं की याबाबत अजून कोणताही कॅबिनेट निर्णय झालेला नाही.

  • आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या चर्चेला विशेष महत्व प्राप्त झालं आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महायुती सरकारची अत्यंत लोकप्रिय ठरलेली योजना. या योजनेअंतर्गत २१ ते ६५ वयोगटातील पात्र लाभार्थी महिलांना दरमहा १५०० रूपये मिळतात. विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाचं श्रेयही महायुती सरकार लाडक्या बहिणींना देतात.

दरम्यान, आता आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार 'लाडकी सुनबाई योजना' सुरू करण्याच्या विचारात असल्याची माहिती समोर आली आहे. रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार या योजनेची घोषणा करणार असल्याची माहिती सु्त्रांकडून प्राप्त झाली आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पत्रकार परिषदेत अजित पवार म्हणाले, 'आम्हाला जी काही माहिती असते, आम्ही ती देतो. ज्यावेळेस आम्हाला कुठला निर्णय घ्यायचा आहे. तो निर्णय कॅबिनेटमध्ये घेतला जाईल. त्या निर्णयाबाबत कॅबिनेट नोट काढली जाईल. तसेच पत्रकारांमार्फत जनतेपर्यंत माहिती पोहोचवण्यात येईल. आतापर्यंत कोणताही निर्णय घेतला गेलेला नाही. सरकार नेहमी चांगल्या निर्णयाच्या बाबतीत सकारात्मक असते. पण आता कोणताही निर्णय घेतला जाणार नाही', अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Black Pepper : दररोज काळीमिरी खाल्ल्याने आरोग्याला होतात 'हे' भन्नाट फायदे

Anil Deshmukh : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील हल्ला खोटा? अहवालात नेमकं काय?

Face Care Tips: ग्लोइंग त्वचेसाठी बेसन आणि हळदीचा पॅक लावताय? थांबा, होतील 'हे' दुष्परिणाम

Kolhapur News : कोल्हापुरात इमारतीचा स्लॅब कोसळला; अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

Yellow Nails: नखांचा रंग पिवळा झालाय? वेळीच व्हा सावध, असू शकतो 'हा' गंभीर आजार

SCROLL FOR NEXT