Eknath Shinde Gondia Politics Updates  SaamTV
महाराष्ट्र

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंनी डाव टाकला, पुन्हा मोठा राजकीय भूकंप; केंद्रबिंदू गोंदियात

Big blow for Maharashtra Gondia Congress : उद्धव ठाकरेंचा एक-एक महत्वाचा नेता गळाला लावला असतानाच, एकनाथ शिंदेंनी आता आणखी एक मोठा डाव टाकला आहे. या डावाने शिंदेंनी थेट काँग्रेसला धोबीपछाड दिला आहे.

Prashant Patil

शुभम देशमुख, साम टिव्ही

गोंदिया : महाराष्ट्रात विविध राजकीय पक्षांमध्ये इनकमिंग आणि आऊटगोइंग सुरूच आहे. कोकणात 'ऑपरेशन टायगर' सुरू असून, एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना जोरदार धक्के दिले आहेत. आता शिंदेंनी मोठा डाव टाकला आहे. त्यांनी मोठा राजकीय भूकंप घडवून आणला असून, त्याचा केंद्रबिंदू हा थेट गोंदियात आहे. त्याचे हादरे मात्र काँग्रेसला बसले आहेत.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. गोंदियातील काँग्रेसचे माजी आमदार सहसराम कोरोटे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशावेळी स्वतः एकनाथ शिंदे उपस्थित होते.

माजी आमदार सहसराम कोरोटे हे विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून लढण्यास इच्छुक होते. मात्र, पक्षाकडून त्यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे कोरोटे हे नाराज होते. अखेर तीन महिन्यांनी कोरोटे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. गोंदिया जिल्ह्यातील देवरी शहरात शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा झाला. या मेळाव्याला एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीतच कोरोटे यांनी पक्षप्रवेश केला.

कोरोटेंची नाराजी, काँग्रेसला खिंडार

अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने माजी आमदार कोरोटे यांना उमेदवारी दिली नाही. त्यामुळे ते प्रचंड नाराज होते. त्यामुळं शिंदेंच्या नेतृत्वात कोरोटेंनी शिवसेनेत प्रवेश केला. कोरोटेंच्या नाराजीचा मोठा फटका काँग्रेसला गोंदियात बसला आहे. कोरोटे यांच्यासह परिसरातील हजारो कार्यकर्ते आणि काही ग्रामपंचायतींच्या सरपंचांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे हा काँग्रेसला मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.

नाना पटोलेंवर आरोप

कोरोटे यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याआधी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर आरोप केले होते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सूडभावनेतून माझं तिकीट कापल्याचा आरोप कोरोटे यांनी नाना पटोले यांच्यावर केला. आमगाव देवरी विधानसभा मतदारसंघाचा विकास करण्यासाठी मी शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे कोरोटे यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वाह रं पठ्ठ्या! ट्रेनच्या सीटवर झोपला; थंड हवेसाठी डोक्याच्या शेजारी कुलर ठेवला, देसी जुगाड पाहून सगळेच थक्क

Anant Chaturdashi 2025 live updates : चिंचपोकळीचा चिंतामणी विसर्जनासाठी मार्गस्थ

Maharashtra Live News Update: दारूच्या नशेत पतीने जंगलात नेऊन पत्नीचा गळा दाबला - गडचिरोली

Most Expensive School: १ कोटी रुपये फी अन् शाही थाट, 'ही' आहे जगातील सर्वात महागडी शाळा

लालबाग परिसरात भयंकर अपघात, २ मुलांना भरधाव वाहनानं चिरडलं; चिमुकलीचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT