Devendra Dandavis Nagpur News Saam Tv
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीसांचं नागपुरात जंगी स्वागत; कार्यकर्त्यांचं प्रेम बघून म्हणाले, मी पुन्हा...,

यावेळी कार्यकर्त्यांनी फडणवीसांचं जल्लोषात स्वागत केलं.

साम टिव्ही ब्युरो

नागपूर : राज्यात नवीन स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस (Eknath Shinde) सरकारने विधानसभेत बहुमताचा आकडा गाठून आपलं सरकार मजबूत असल्याचं दाखवून दिलं. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पहिल्यांदाच नागपूर शहरात पोहचले. यावेळी त्यांच्या समर्थकांसह भाजप कार्यकर्त्यांनी फडणवीसांचं नागपुरात जंगी स्वागत केलं. (Devendra Fadnavis Latest News)

पक्षासाठी देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्याने त्यांच्यावर भाजपा नेत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत असतानाच नागपुरात स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केली. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर देवेंद्र फडवणीस यांच्याकडे अनपेक्षितपणे उपमुख्यमंत्रीपद आलं आणि त्यानंतर आज पहिल्यांदाच ते नागपुरात दाखल झाले.

यावेळी कार्यकर्त्यांनी फडणवीसांचं जल्लोषात स्वागत केलं. यावेळी 'नागपूरकरांनी नेहमीच मला साथ दिली आहे. पाच वेळा मला आमदार केले आहे. दोन वेळ नगरसेवक म्हणून आणि महापौर म्हणून माझ्यावर विश्वास दाखवला आहे. आज पुन्हा मी उपमुख्यमंत्री म्हणून आलो तर तुमचे प्रेम कायम आहे. तुमचे मनापासून आभार मानतो', असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. (Devendra Fadnavis News)

देवेंद्र फडणवीस यांचे आज सकाळी 11 वाजता नागपूर विमानतळावर आगमन झालं. यावेळी ढोल ताशाच्या निनादात त्यांचं स्वागत करण्यात आलं. विमानतळावर स्वागत केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची रथात बसवून भव्य मिरवणुकही काढण्यात आले.

यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची देखील उपस्थिती होती. देवेंद्र फडणवीस यांची धरमपेठ येथील त्यांच्या निवासस्थानी जाहीर सभा होणार आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT