शिवछत्रपतींच्या पादुकांचे शिवनेरीहून पंढरपूरला प्रस्थान 
महाराष्ट्र

शिवछत्रपतींच्या पादुकांचे शिवनेरीहून पंढरपूरला प्रस्थान

भागवत परंपरेच्या दृष्टीने आत्यंतिक महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी होण्यासाठी छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पादुकांनी शिवजन्मभूमी शिवनेरीहून प्रस्थान केले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मंगेश गाडे

जुन्नर : भागवत परंपरेच्या दृष्टीने आत्यंतिक महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी होण्यासाठी छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पादुकांनी शिवजन्मभूमी शिवनेरीहून प्रस्थान केले आहे. Departure of Shivchhatrapati's Padukas from Shivneri to Pandharpur

श्री शिवछत्रपतींच्या पादुकांवर किल्ले शिवनेरीवर रुद्राभिषेक झाल्यानंतर शिवाई देवीची महापूजा बांधून, गडाच्या महाद्वार पूजना नंतर पायी पालखी सोहळा या वर्षी करोना महामारीच्या निर्बंधामुळे रायगडच्या दिशेने प्रतिकात्मक एक हजार पावले चालून पुढे वाहनाने मार्गस्थ झाला होता.

हे देखील पहा -

कोरोना महामारीमुळे शासकीय प्रतिबंधात्मक नियम कठोर असल्याने, शिवाई देवीच्या चरणांशी असलेल्या शिवछत्रपतींच्या पादुका घेऊन जाण्याची सेवेची संधी यावर्षी योगऋषी सुधीर इंगवले, ऍड.भाऊसाहेब शिंदे, ऍड.राहुल कदम, हभप.साहिलबुवा शेख व पलाश देवकर यांना मिळाली आहे.

कोरोना काळातही सर्व नियम-निर्बंध पाळून सोहळ्यास यशस्वी करण्यासाठी स्थानिक पातळीवर आवश्यक त्या परवानग्या मिळण्यासाठी पुरातत्व विभाग, वनविभाग, स्थानिक जुन्नर पोलीस स्टेशन,गडावरील शिवाई देवीचे पुजारी सोपानजी दुराफे या सर्व शासकीय व स्थानिक मंदिर संस्थान यांनी परिश्रम घेतले आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kiku Sharda: मी नेहमी शोसोबत...; द ग्रेट इंडियन कपिल शो सोडण्याबाबत किकू शारदाने व्यक्त केल्या भावना, म्हणाला...

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

Maharashtra Live News Update: पुण्यातील दगडूशेठ गणपती मिरवणुकीच्या रथाला आकर्षक रोषणाई

Deepa Parab: मन झालं बाजिंद, ललकारी ग...

GK: डावखुऱ्या लोकांचा मेंदू जास्त ॲक्टिव्ह का मानला जातो? जाणून घ्या कारणे

SCROLL FOR NEXT