12 वर्षीय मुलीने केले कॅंन्सरग्रस्तांना केस दान

आपल्या वडिलांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या विद्यार्थिनीचा अभिनव उपक्रम गौरवास्पद आहे. तिने हा उपक्रम राबवत सर्वांना काही तरी वेगळं करण्याची प्रेरणा दिली आहे.
12 वर्षीय मुलीने केले कॅंन्सरग्रस्तांना केस दान
12 वर्षीय मुलीने केले कॅंन्सरग्रस्तांना केस दानलक्ष्मण सोळूंके
Published On

लक्ष्मण सोळूंके

जालन्यात एका १२ वर्षीय विद्यार्थिनीने (Jalna) कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी आपण ही काही तरी करावं म्हणून स्वतःचे केस कॅन्सरग्रस्त रुग्णांना मदत करणाऱ्या मदत फाऊंडेशनला (Madat Foundation) दान दिले आहे. आपल्या वडिलांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या विद्यार्थिनीचा अभिनव उपक्रम गौरवास्पद आहे. तिने हा उपक्रम राबवत सर्वांना काही तरी वेगळं करण्याची प्रेरणा दिली आहे.

जालना शहरातील १२ वर्षाय नेत्रा प्रणय पहाडे अस या विद्यार्थिनीचं नाव असून लाॅकडाऊन काळात तिची आत्ये बहीण बंगरुळ वरून तिच्या घरी राहण्यासाठी आली असता,आपल्या आत्ये बहिणीचे केस छोटे कसे झाले ? यांची उत्सुकता नेत्राला लागली होती. आत्ये बहिणीने आपण केस कॅन्सर रुग्णांना दान दिले असल्याची माहिती नेत्राला दिली, नेत्राने ही आपण ही या कॅन्सर ग्रस्त रुग्णासाठी काही तरी करावं अशी प्रेरणा तिच्या मनात जागी झाली,आणि तिने ही आपले केसदान करण्याचा संकल्प मनी बाळगत केसदांन करण्याची इच्छा आई वडिलांना बोलाऊन दाखवली.

आपली इच्छा पूर्ण व्हावी म्हणून नेत्राच्या वडिलांनी कॅन्सर ग्रस्तांना मदत करणाऱ्या मुंबई च्या "मदत" या संस्थेशी संपर्क करून आपल्या मुलीचा ही कॅन्सर ग्रस्ताना केसदांन करण्याचा संकल्प असल्याचे सांगितले आणि या संस्थेला नेत्रांनी आपले १३ इंच केसदान केले. नेत्रानं दान केलेले केस मुंबईतील मदत फाऊंडेशनला कुरीयरद्वारे पाठवण्यात आले आहेत.

12 वर्षीय मुलीने केले कॅंन्सरग्रस्तांना केस दान
सात ICC ट्रॅाफीमध्ये 7 वेगवेगळे विजेते; जाणून घ्या सविस्तर

मदत फाऊंडेशन गोरगरीब कॅन्सरग्रस्त बालकांना मोफत विग करून देते. कॅन्सरग्रस्तांना केस नसतात त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलण्यासाठी केस दान केल्याचं नेत्रानं म्हटलंय. तर नेत्राचा आनंद हाच आमचा आनंद असल्याचं तिच्या आईने म्हटलंय. तर आयुष्यात कायमस्वरूपी आठवणीत राहील असं गिफ्ट मुलीनं दिल्याचं तिच्या वडिलांनी म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com