संत निळोबाराय पालखीचे प्रस्थान जिल्हाधिकारी व एसपींच्या उपस्थितीत झाले.
संत निळोबाराय पालखीचे प्रस्थान जिल्हाधिकारी व एसपींच्या उपस्थितीत झाले. 
महाराष्ट्र

संत निळोबाराय पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे प्रस्थान

सचिन आगरवाल

पिंपळनेर (अहमदनगर) ः संत निळोबाराय महाराज यांच्या पालखीला मोठा मान आहे. जिल्ह्यात अशी एकमेव पालखी आहे. महाजांच्या पादुकांचे सकाळी ११ वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पंढरपूरकडे शिवशाही बसमधून शाही प्रस्थान झाले. त्या बसचे सारथ्य करण्याचा मान जिल्ह्यातील तारकपूर आगारातील शिवनाथ खाडे, आदिनाथ आव्हाड या दोन सारथ्यांना मिळाला. त्यांच्यासोबत सचिन नेमाने, महादेव गायकवाड व अनंत अडसुरे सोबत असणार आहेत.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, तहसीलदार ज्योती देवरे, देवस्थान दिंडीप्रमुख अशोक सावंत यांच्यासह वारकरी उपस्थित होते. पालखीसोहळ्यासोबत चाळीस वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे. या वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी किरण ज्ञानदेव पठारे यांनी सॅनिटायझर, पाणी बॉटल, मास्क, हँडग्लोज भेट दिले.

निळोबारायांच्या पालखी सोहळ्यासाठी एसटी महामंडळाने दोन शिवशाही बसची व्यवस्था केलीय. तसेच दोन्ही बससोबत प्रशिक्षित वाहन चालक, तांत्रिक कर्मचारी सोबत आहेत, अशी माहिती राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक विजय गिते यांनी दिली.

पंढरपूर येथील आषाढी वारीसाठी श्री संत निळोबारायांच्या पादुका घेऊन जाणाऱ्या बस सुरक्षित पोहचतील व प्रस्थानाच्या ठिकाणी परत सुरक्षित येतील, याचे योग्य ते नियोजन व्हावे याकरिता इसिडेंट कमांडर म्हणून श्रीगोंदा- पारनेरचे उपविभागीय अधिकारी सुधाकर भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्याधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी ही माहिती दिली.

संत निळोबाराय यांच्या पालखी सोहळ्यासाठी शिवशाही बस अशी सजविण्यात आली होती. (छाया - एकनाथ भालेकर)

ते यावेळी म्हणाले की, पंढरपूर येथे आषाढी एकादशीला सर्वात मोठी यात्रा असते. सद्यस्थितीमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू केला आहे. अहमदनगर जिल्ह्यातून श्री संत निळोबाराय महाराजांची ही एकमेव पालखी बसने पंढरपूरकडे जाणार आहे. पादुका घेऊन जाणाऱ्या बसेस पंढरपूर येथे सुरक्षित पोहचतील. प्रस्थानाच्या ठिकाणी परत सुरक्षितरित्या येतील. या बाबत योग्य ते नियोजन करण्यासाठी इसिडेंट कमांडरची नियुक्ती करणे आवश्यक असल्यामुळे जिल्ह्याधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ नुसार इसिडेंट कमांडर म्हणून नियुक्ती केली.

आषाढी वारी संदर्भाने जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिलेल्या सर्व सूचना तसेच मार्गदर्शनाखाली संपूर्ण नियोजन केले आहे. शासनाच्या विविध सूचना, जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन, आरोग्य विभाग, संत निळोबाराय संस्थान या सर्वांशी संपर्क ठेवत पालखी सोहळ्याचे संपूर्ण नियोजन झालेय.

-सुधाकर भोसले, इसिडेंट कमांडर तथा उपविभागीय अधिकारी, श्रीगोंदा - पारनेर

Edited By - Ashok Nimbalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : १७ लाख कुटुंबांनी भारतीय नागरिकत्व सोडलं; प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर हल्लाबोल

IPL 2024 LSG vs KKR: सुनिल नारायणच्या फटकेबाजीने LSG च्या गोलंदाजांना दाखवलं 'आस्मान'; लखनऊसमोर २३६ धावांचे आव्हान

Sharad Pawar News: शरद पवारांची प्रकृती अस्वस्थ, उद्याचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द

IPL 2024 : जडेजाच्या ऑलराउंडर खेळीने पंजाबचं प्लेऑफचं स्वप्न भंगलं; Points Table मध्ये CSKची टॉप-३ मध्ये एंट्री

Prajwal Revanna: प्रज्वल रेवन्नाविरोधात ब्लू कॉर्नर नोटीस जारी, जाणून घ्या काय आहे या नोटीसचा अर्थ

SCROLL FOR NEXT