Dengue Patient, Yavatmal Saam Tv
महाराष्ट्र

Dengue Out Break In Yavatmal : डेंग्यूने घेतला तीन चिमुकल्यांचा बळी, 15 दिवस शाळा राहणार बंद

Siddharth Latkar

- संजय राठोड

Yavatmal News : यवतमाळ जिल्ह्यातील महागांव तालुक्यातील डोंगरगाव येथे डेंग्यूने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. डेंग्यूमुळे आठवड्याभरात तीन चिमुकल्यांना जीव गमवावा लागला आहे. (Maharashtra News)

डेंग्यूचा कहर वाढल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. सध्या गावात डेंग्यूचे दाेन रुग्ण असल्याची माहिती प्राप्त झालेली आहे. गावात डेंग्यू प्रतिबंधक उपाययाेजना (फाॅगिंग) करण्यात आली आहे.

दरम्यान डोंगरगाव उर्दु शाळेतील एका विद्यार्थ्यींनीचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याने ग्रामस्थांनी शाळा व्यवस्थापन समिती समवेत बैठक घेत शाळा 15 दिवसांसाठी बंद ठेवण्याचा ठराव केला. या ठरावात येत्या 20 ऑक्टोबर पर्यंत डेंग्यूवरील उपयायाेजना करण्यासाठी शाळा बंद ठेवण्यात यावी असे म्हटले आहे.

डोंगरगाव हे वेणी धरणाच्या पायथ्याशी वसलेलं तीन हजार लोकसंख्येचे गाव आहेत. जो पर्यंत डेंग्यू (dengue), मलेरिया इतर व्हायरल इन्फेक्शन आटोक्यात येत नाहीत तोपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा ठराव ग्रामपंचायतीने घेतला आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

iPhone 16 Sale Video : iPhone 16 च्या खरेदीसाठी अॅपल स्टोअर बाहेर झुंबड; बघा Video

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर

Maharashtra Politics: काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या, कुणाला मोठा भाऊ खुमखुमी असेल तर... ठाकरे गटाचा इशारा

Mumbai Crime: मुंबईत १३ वर्षीय मुलावर शौचालयात लैंगिक अत्याचार; मुलुंड परिसरातील धक्कादायक प्रकार

Jasprit Bumrah: नाद करा पण बुमराहचा कुठं.. चेंडू सोडण्याच्या प्रयत्नात बांगलादेशी फलंदाजाची दांडी गुल- VIDEO

SCROLL FOR NEXT