democratic party of india morcha in kolhapur news sml80 saam tv news
महाराष्ट्र

Kolhapur : हातकणंगलेमधील मारामारीच्या प्रकरणावरुन डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर माेर्चा

हातकणंगले पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात आज डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने कोल्हापूरात माेर्चा काढण्यात आला.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur News :

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले (hatkanangale) तालुक्यातील हेरले येथील धीरज दीपक लोखंडे या मागासवर्गीय तरुणाला दिवसाढवळ्या घरातून उचलून गावगुंडांनी जबर मारहाण करत गंभीर जखमी केल्याचा आराेप डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाने केला आहे. या मारहाणीमुळे लोखंडे हा सध्या मृत्यूशी झुंज देत आहे. हातकणंगले पोलिसांनी संबंधित गुंडांवर जुजबी कारवाई करत संशयितांना पाठीशी घातल्याचा आरोप डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाने (democratic party of india morcha in kolhapur) केला आहे. (Maharashtra News)

दरम्यान हातकणंगले पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात आज डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने कोल्हापूर शहरातील प्रमुख रस्त्यावरून जोरदार घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढला. या माेर्चात महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.

धीरज लोखंडेला मारहाण करणाऱ्या गाव गुंडांवर कलम 307 आणि ऍट्रॉसिटी ॲक्ट कायद्याअंतर्गत कारवाई करावी. हातकणंगले पोलीस ठाण्याचे प्रमुख महादेव तोंडले यांच्यावर खातेनिहाय चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे हातकणंगले तालुका अध्यक्ष विकास अवघडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. या माेर्चा दरम्यान शाहूपुरी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri Tourism : मनाला भुरळ घालणारा रत्नागिरीतील ट्रेकिंग स्पॉट, दिवाळीत ट्रिप प्लान करा

Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडीची दिवाळी, व्हिडिओ पाहून थक्क व्हाल

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

Shah Rukh Khan : शाहरुख खानच्या 'मन्नत'मध्ये होणार नाही दिवाळी पार्टी, नेमकं कारण काय?

Budget Streaming: BSNL ने लाँच केला सर्वात स्वस्त प्लॅन, फक्त ₹३० मध्ये मिळवा OTT अ‍ॅक्सेस अन् मनोरंजनाची सुविधा

SCROLL FOR NEXT